अकोला: अकोला महापालिकेच्या एकवीसशे कर्मचाºयांना पुन्हा पगाराच्या प्रतीक्षेत ताटकळत राहण्याची वेळ आली आहे. सप्टेंबर, आॅक्टोबर, नोव्हेंबर महिन्याचे कर्मचाºयांचे पगार थकले आहे. दरम्यान, महापालिका प्रशासनाचा आता रेल्वेच्या जागेच्या ५ कोटी रुपयांवर डोळा आहे. ही रक्कम मिळताच महापालिका कर्मचाºयांच्या थकीत वेतनाचा प्रश्न निकाली निघणार आहे.अकोला महापालिकेत एकवीसशे कर्मचारी सेवारत असून, कर्मचाºयांना पगारासाठी ८ कोटींची आवश्यकता आहे. महापालिका आयुक्त जितेंद्र वाघ रजेवर गेल्याने कर्मचाºयांच्या पगाराचा प्रश्न प्रलंबित आहे. महापालिकेतील विविध संघटनांनी आता पगाराच्या मुद्द्यावर मोर्चेबांधणी सुरू केली आहे. महापौर विजय अग्रवाल यांना भेटून पगाराचा प्रश्न तातडीने सोडविण्याची मागणी करण्यात आली आहे.रेल्वे प्रशासनाने ५ कोटीचा निधी जागेच्या मोबदल्यात देऊ केला असून, ही प्रक्रिया लालफीतशाहीत अडकली आहे. ही रक्कम लवकरच मिळविण्यासाठी महापालिका प्रशासन विशेष लक्ष घालून आहे. महापालिकेतील कर्मचाºयांंचे वेतन नियमित करण्यात येईल, असे आश्वासन सुरुवातीला देण्यात आले होते. यासाठी सत्ताधाºयांनी प्रयत्नही केले; मात्र त्यांना यामध्ये यश आले नाही.