अकोला: शहरातील अतिक्रमणाच्या समस्येचा अकोलेकरांना वैताग आला आहे. रस्त्यालगत जागा दिसेल त्या ठिकाणी उघड्यावर अतिक्रमक बाजार मांडत असल्यामुळे वाहतुकीच्या समस्येत भर पडली आहे. अतिक्रमणाच्या समस्येवर प्रभावी उपाय म्हणून महापालिका आयुक्त संजय कापडणीस यांनी लघू व्यावसायिक, फेरीवाल्यांना विशिष्ट भागात जागा उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने हॉकर्स झोन निश्चित केले. बाजार विभाग, नगररचना व बांधकाम विभागाच्या समन्वयातून २१ ठिक ाणी हॉकर्स झोन तसेच ३१ ठिकाणी ‘नो हॉकर्स झोन’ निश्चित केले. तरीही मुख्य रस्त्यालगतचे अतिक्रमण कायम असल्यामुळे लघू व्यावसायिक, फेरीवाला संघटनेच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.शहरातील मुख्य रस्ते अतिक्रमकांनी गिळंकृत केले आहेत. रेडीमेड ड्रेस विक्रेता, फळ विके्रता तसेच विविध साहित्याची विक्री करणाऱ्या लघू व्यावसायिक, फेरीवाल्यांनी चक्क रस्त्यांवरच दुकाने थाटल्याचे चित्र आहे. शहरातील मोठी प्रतिष्ठाने, दुकानांसमोर लघू व्यावसायिक बाजार मांडत असल्यामुळे अनेकदा दोन्ही व्यावसायिकांमध्ये वाद निर्माण होतात. अतिक्रमणाचे लोन गल्लीबोळात पसरले असून, अनेकांनी चक्क सर्व्हिस लाइनमध्ये भाजी विक्रीची दुकाने उभारली आहेत. मुख्य बाजारपेठेत अतिक्रमणाच्या समस्येमुळे नागरिकांना पायी चालणे मुश्कील झाले आहे. मनपाच्या अतिक्रमण विभागाकडून अतिक्रमकांना वारंवार हुसकावून लावल्या जात असल्याने त्रस्त झालेल्या अतिक्रमकांकडून फेरीवाला धोरण लागू करण्याची मागणी जोर धरू लागली. या सर्व बाबी ध्यानात घेऊन महापालिका आयुक्त संजय कापडणीस यांनी शहरात विशिष्ट भागात ‘हॉकर्स व नो हॉकर्स झोन’च्या जागा निश्चित करण्याचे निर्देश बाजार विभाग, नगररचना विभाग, बांधकाम विभागाला दिले होते. संबंधित विभागाने समन्वय साधत फेरीवाले, लघू व्यावसायिकांना पर्यायी व्यवस्था म्हणून २१ ठिकाणी ‘हॉकर्स झोन’ व ३१ जागा ‘नो हॉकर्स झोन’ म्हणून घोषित केल्या. तशी यादी तयार करण्यात येऊन फेरीवाला संघटनेच्या माध्यमातून जागांचे वाटप करण्यात आले. संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनीसुद्धा पत्रकार परिषदेत निश्चित जागेवर दुकाने थाटण्याचे अतिक्रमकांना आवाहन केले होते.अतिक्रमण विभागातील कर्मचाºयांसोबत वादगांधी रोड चौपाटीवर अतिक्रमकांनी पुन्हा एकदा विविध साहित्य विक्रीची दुकाने थाटली आहेत. त्यांना हुसकावण्यासाठी गेलेल्या मनपाच्या अतिक्रमण निर्मूलन पथकातील कर्मचाºयांसोबत वाद घातल्या जात आहेत. याप्रकरणी शनिवारी अतिक्रमण विभाग प्रमुख नरेंद्र घनबहादूर यांनी सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली आहे.