अकोला: गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत सत्तास्थानी असणाºया भाजपाच्या कार्यकाळात महापालिकेची अतिशय बिकट वाटचाल सुरू असल्याचे दिसत आहे. शहरातील विकास कामांसाठी शासनाकडून कोट्यवधींचा निधी प्राप्त होत असला, तरी या कामांच्या अंमलबजावणीसाठी मनपात सक्षम अधिकारीच उपलब्ध नसल्याची परिस्थिती आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांची पदे रिक्त असल्यामुळे प्रशासकीय कामकाज विस्कळीत झाले असून, मनपा आयुक्त संजय कापडणीस यांच्यावर अतिरिक्त ताण येत असल्याचे चित्र आहे. या रिक्त पदांचा अनुशेष दूर करण्यात सत्ताधारी भाजपा सपशेल अपयशी ठरल्याचे चित्र समोर आले आहे.केंद्रात आणि राज्यात भाजपाने सत्ता मिळविल्यानंतर अकोलेकरांनी महापालिकेची सत्ता भाजपाकडे सोपविली. २०१४ मध्ये पार पडलेल्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत अकोलेकरांनी भाजपाच्या पारड्यात मतांचे भरभरून दान दिले. त्यात भरीस भर म्हणून अमरावती विभाग पदवीधर मतदारसंघही भाजपाच्या ताब्यात सोपविला. भाजपाकडे एकहाती सत्ता दिल्यास शहरातील विकास कामे झटपट निकाली निघतील, असा अकोलेकरांना विश्वास होता. शहरातून भाजपाचे दोन आमदार असून, योगायोगाने नगर विकास राज्यमंत्री पदही अकोल्याच्या वाटेला आले आहे. शासनाच्या स्तरावर भाजप लोकप्रतिनिधींचा बोलबाला दिसत असला तरी प्रत्यक्षात परिस्थिती निराळी आहे. महापालिकेतील वरिष्ठ अधिकाºयांची पदे रिक्त असल्यामुळे प्रशासकीय कामकाज प्रभावित झाले आहे. त्याचा गैरफायदा कंत्राटदारांकडून घेतला जात आहे. आज रोजी मनपातील दोन्ही उपायुक्त पदे रिक्त आहेत. हा प्रकार कमी म्हणून की काय, मुख्य लेखा परीक्षक, शहर अभियंता यांच्यासह सुमारे डझनभर पदे रिक्त आहेत. यासंदर्भात महापालिका आयुक्त संजय कापडणीस यांनी शासनाकडे वारंवार शिफारस केल्यावरही शासन उदासीन असल्याचे दिसत आहे. उण्यापुºया वर्षभरापूर्वी मनपात उपायुक्त पदावर सुमंत मोरे नियुक्त झाले. त्यांच्याकडे उपायुक्त प्रशासन व उपायुक्त विकास अशा दोन्ही पदांचा पदभार सोपविण्यात आला होता. त्यांची शासनाने नुकतीच बदली केली असली तरी त्या बदल्यात दुसºया अधिकाºयाचा नियुक्ती आदेश जारी करण्यास शासनाला विसर पडल्याचे दिसून येते. या प्रकारामुळे इतर अधिकाºयांवरचा ताण वाढत असून, सत्ताधाºयांना त्याचे काहीही सोयर सुतक नसल्याचे चित्र आहे. एकूणच भाजपाच्या कार्यकाळात महापालिकेची बिकट वाटचाल सुरू असल्याने रिक्त पदांचा अनुशेष दूर करण्यासाठी लोकप्रतिनिधी पुढाकार घेतील का, असा प्रश्न सर्वसामान्य अकोलेकर विचारत आहेत.
महिला अधिकाºयांकडे सूत्रे!शासनाने सहायक आयुक्त पदावर डॉ. दीपाली भोसले, सहायक आयुक्त पूनम कळंबे यांची नियुक्ती केली. आज रोजी मनपातील दोन्ही उपायुक्त पदे रिक्त असल्यामुळे संबंधित दोन्ही महिला अधिकाºयांकडे उपायुक्त पदांचा अतिरिक्त प्रभार सोपविण्यात आला आहे. या दोन्ही अधिकाºयांचा परिविक्षाधीन कालावधी असल्याने आयुक्त संजय कापडणीस यांच्याही जबाबदारीत वाढ झाल्याचे चित्र आहे.
ही पदे आहेत रिक्त!उपायुक्त ०२सहायक आयुक्त ०२उपसंचालक नगररचना ०१मुख्य लेखा परीक्षक ०१मूल्य निर्धारण कर संकलन अधिकारी ०१मुख्य अग्निशमन अधिकारी ०१शहर अभियंता ०१कार्यकारी अभियंता (साबांवि) ०१उपअभियंता ०१आरोग्य अधिकारी ०१सहा. मूल्य निर्धारण अधिकारी ०१