काेराेनामुळे व्यवसायावर परिणाम
फेब्रुवारी महिन्यापासून काेराेनाचा प्रादुर्भाव माेठ्या प्रमाणात वाढल्याचे समाेर आले आहे. यादरम्यान, शासनाने कडक निर्बंध लागू केले. अशा परिस्थितीत मनपाने वाहनतळाची निविदा प्रसिद्ध केली. काेराेनामुळे व्यवसाय काेलमडल्याचे चित्र असल्याने वाहनतळाच्या निविदेकडे लक्ष लागले आहे.
पाच वर्षांसाठी करारनामा
मनपाने यापूर्वी प्रसिद्ध केलेल्या निविदेत जागांचे दर जास्त असताना ११ महिन्यांसाठी करार असल्याचे नमूद हाेते. सदर दर एक वर्षांसाठी परवडणारे नसल्याची बाब निदर्शनास आल्यानंतर महापालिकेने सदर जागा पाच वर्षांच्या करारनाम्यावर देण्याचा निर्णय घेतला.
बाजार वसुलीसाठी ६० लाख मूल्य
दैनंदिन बाजार वसुलीसाठी मनपाने ६० लक्ष रुपये मूल्य निश्चित केले आहे. गतवर्षी बाजार वसुलीपासून मनपाला ३४ लाख रुपयांचे उत्पन्न प्राप्त झाले हाेते. बाजार वसुलीची निविदा ५ जून राेजी उघडली जाणार आहे.