शहरं
Join us  
Trending Stories
1
TATA IPL Auction 2025 Live : कोण खाणार 'भाव', कोण उधळला जाणार डाव; मेगालिलावात ५७७ खेळाडूं रिंगणात
2
सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग, अजित पवारांची राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी निवड
3
३३०० कोटींची संपत्ती… भाजपच्या सर्वात श्रीमंत उमेदवाराचा निकाल काय लागला?
4
विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची अवस्था फारच बिकट; 'या' दोन विजयांनी पक्षाला मिळाला दिलासा
5
IND vs AUS : टीम इंडियानं सेट केलं ५३४ धावांचं टार्गेट; मग ऑस्ट्रेलियाला धक्क्यावर धक्के
6
'दैत्यांचा पराभव झाला...' कंगना राणौतची निकालावर प्रतिक्रिया; म्हणाली, "माझं घर तोडलं..."
7
Mahesh Sawant : "दोन बलाढ्यांसमोर टिकाव लागेल की नाही ही शंका होती, पण..."; महेश सावंतांनी स्पष्टच सांगितलं
8
वर्षभरानंतर किंग Virat Kohli च्या भात्यातून आली सेंच्युरी! सर Don Bradman यांना केलं ओव्हरटेक
9
जिथे BJP विरोधात थेट लढाई, तिथे काँग्रेसचे झाले पानिपत; 75 पैकी 65 जागा गमावल्या...
10
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 : 'लोकांना शंका, निवडणुकीला आव्हान दिलं पाहिजे'; असीम सरोदेंनी निकालावर व्यक्त केली शंका
11
"सगळीकडे नाही तर निवडक ठिकाणी EVM हॅक'; महाराष्ट्राच्या निकालावर काँग्रेस नेत्याचे विधान
12
IPL Auction 2025: लिलावात बड्या खेळाडूंवर लागणार 'जम्बो' बोली... पाहा, कोणाकडे किती पैसे शिल्लक?
13
Amol Mitkari : "अजित पवारांप्रमाणे सुप्रिया सुळेंनी औदार्य दाखवावं, अमोल कोल्हेंनी..."; मिटकरींचं टीकास्त्र
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: अवघ्या १६२ मतांनी विजयी होऊन आमदार बनले; AIMIM पक्षानं त्यांची एकमेव जागा राखली
15
'अदानी-मणिपूर प्रकरणावर हिवाळी अधिवेशनात चर्चा व्हावी', काँग्रेसची सर्वपक्षीय बैठकीत मागणी
16
सरवणकर-अमित ठाकरे लढतीत महेश सावंत कशी बाजी मारून गेले? असं बदललं माहिमचं समीकरण
17
Narhari Zirwal : "उपाध्यक्ष पदाचा अनुभव घेतला, आता...."; नरहरी झिरवाळांनी सांगितलं 'मन की बात'
18
रोहित भाऊ ऑस्ट्रेलियात पोहचला; हिटमॅनची एन्ट्री टीम इंडियासह KL राहुलचं टेन्शन वाढणारी; कारण...
19
"बसपा कोणतीही पोटनिवडणूक लढवणार नाही", मायावतींची मोठी घोषणा; कारणही सांगितलं  
20
यशस्वी-KL राहुलच्या हिट शोनंतर कोहलीची फिफ्टी! टीम इंडियाची आघाडी ४०० पार...

मनपाच्या शाळा इमारती शिकस्त; विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2018 1:06 PM

अकोला: महापालिकेच्या एकूण ३३ शाळांपैकी सुमारे दहा शाळेच्या इमारती अत्यंत शिकस्त असल्याची बाब तांत्रिक अहवालात समोर आल्याने गोरगरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.

ठळक मुद्देशहरात महापालिकेच्या ३३ शाळा असून यामध्ये मराठी, हिंदी व उर्दू माध्यमाचा समावेश आहे.बहुतांश शाळांमध्ये मूलभूत सुविधांची बोंब असून, सुविधा निर्माण करण्यासाठी मनपाकडे निधीची कमतरता नसल्याची परिस्थिती आहे; सत्ताधारी भाजपासह विरोधी पक्षातील नगरसेवकांप्रमाणेच खुद्द प्रशासनाचेही दुर्लक्ष होत असल्याचे केविलवाणे चित्र आहे.

अकोला: महापालिकेच्या एकूण ३३ शाळांपैकी सुमारे दहा शाळेच्या इमारती अत्यंत शिकस्त असल्याची बाब तांत्रिक अहवालात समोर आल्याने गोरगरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. भविष्यातील अनुचित प्रकार टाळण्यासाठी संबंधित शिकस्त इमारतींच्या दुरुस्तीसाठी महापालिका प्रशासनाने तडकाफडकी निर्णय घेण्याची गरज निर्माण झाली आहे.शहरात महापालिकेच्या ३३ शाळा असून यामध्ये मराठी, हिंदी व उर्दू माध्यमाचा समावेश आहे. बहुतांश शाळांमध्ये मूलभूत सुविधांची बोंब असून, सुविधा निर्माण करण्यासाठी मनपाकडे निधीची कमतरता नसल्याची परिस्थिती आहे; परंतु या विषयाकडे सत्ताधारी भाजपासह विरोधी पक्षातील नगरसेवकांप्रमाणेच खुद्द प्रशासनाचेही दुर्लक्ष होत असल्याचे केविलवाणे चित्र आहे. मनपा शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या गोरगरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांना मूलभूत सुविधांची पूर्तता होते किंवा नाही, याची तपासणी करण्याचे काम शिक्षणाधिकाºयांचे आहे. शाळेत मुला-मुलींसाठी शौचालय, वर्गात पंखे, लाईट, बसण्यासाठी बेंच तसेच पिण्यासाठी शुद्ध पाणी, खेळासाठी मैदान, क्रीडा साहित्य उपलब्ध करून देणे शिक्षण विभागाची नैतिक जबाबदारी आहे. ही जबाबदारी आपण किती प्रामाणिकपणे निभावतो, यावर शिक्षण विभागाने आत्मचिंतन करण्याची गरज आहे. केवळ बदल्यांमध्ये ‘इन्टरेस्ट’ठेवणाºया शिक्षण विभागाच्या दुर्लक्षामुळे आज रोजी ३३ शाळांपैकी १० शाळांमधील इमारती अत्यंत शिकस्त असल्याचे धक्कादायक वास्तव उजेडात आले आहे.

निधी आहे तर बांधकाम का नाही?मनपाच्या दहा शाळांमधील शिकस्त झालेल्या इमारती कोणत्याही क्षणी कोसळू शकतात. अशा वेळी मोठी जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आज रोजी मनपाकडे कोट्यवधींचा निधी असल्याचा गवगवा सत्ताधारी पक्षाकडून केला जातो. निधी उपलब्ध असताना नवीन इमारतीचे बांधकाम का केले जात नाही,असा सवाल उपस्थित होतो.

वर्ग खोल्यांमध्ये पावसाचे पाणी!जुने शहरातील मनपाच्या मराठी मुलांची शाळा क्रमांक १ मधील वर्ग खोल्यांची अतिशय दुरवस्था झाली आहे. पावसाचे पाणी थेट छतावरून वर्ग खोल्यांमध्ये शिरल्याचे चित्र समोर आले आहे. मैदानात पाणी साचले असून, चिखलातून वाट तुडवित विद्यार्थ्यांना वर्ग खोल्यात जावे लागत आहे. शिकस्त खोल्या दुरुस्तीच्या संदर्भात संबंधित मुख्याध्यापकांनी शिक्षण विभागाकडे वारंवार पाठपुरावा केला आहे, हे येथे उल्लेखनीय.मनपाच्या दहा शाळांमधील इमारती शिकस्त असून, कोणत्याही क्षणी अपघात होण्याची शक्यता आहे. त्यासाठी सत्ताधारी व प्रशासन पुढाकार घेत नसल्याने गोरगरीब विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात सापडला आहे. शिकस्त इमारती पाडून नवीन इमारती तयार करण्यासाठी प्रशासनाला पत्र दिले आहे. प्रशासनाने वेळीच पाऊले न उचलल्यास सर्वांना गंभीर परिणाम भोगावे लागतील.-साजीद खान पठाण, विरोधी पक्षनेता, मनपा. 

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola Municipal Corporationअकोला महानगरपालिका