अकोला: संसर्गजन्य कोरोना विषाणूला आळा घालण्यासाठी महापालिका प्रशासनाने बाहेरगावाहून शहरात दाखल होणाऱ्या नागरिकांच्या नोंदी घेण्याच्या अनुषंगाने सर्व्हेला प्रारंभ केला आहे. शनिवारपर्यंत मनपाने गठित केलेल्या पथकांनी ४८ हजार मालमत्तांना भेटी देत १ हजार ३०० नागरिक ांची नोंद केल्याची माहिती आहे.कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता राज्य सरकारच्या निर्देशानुसार जिल्हा प्रशासन तसेच महापालिका प्रशासन स्थानिक पातळीवर विविध उपाययोजनांची अंमलबजावणी करीत आहेत. गत ६ मार्चपासून शहराच्या विविध भागात परदेशातून तसेच आंध्र प्रदेश, पुणे, गोवा, मुंबई, भोपाळ यांसह परराज्यातून मोठ्या प्रमाणात नागरिक दाखल झाल्याची माहिती आहे. यासंदर्भात मनपातील वरिष्ठ अधिकारी तसेच वैद्यकीय आरोग्य यंत्रणेला अवगत केल्यानंतरही बाहेरगावाहून येणाºया नागरिकांची कोणत्याही प्रकारची नोंद ठेवल्या जात नसल्याची गंभीर बाब समोर आली होती. कोरोनाची लागण झालेल्या रुग्णाच्या संपकर् ात नसलेल्या व्यक्तींमध्येसुद्धा कालांतराने कोरोनाची लक्षणे आढळून आल्याची प्रकरणे मोठ्या शहरांमध्ये उजेडात आली आहेत. उशिरा का होईना, मनपा प्रशासनाने शहरात बाहेरगावाहून दाखल होणाºया नागरिकांचा शोध घेऊन त्यांची नोंद घेणे सुरू केले आहे. त्यासाठी मनपाने ४८ पथकांचे गठन केले असून, सहायक आयुक्त पूनम कळंबे यांच्या मार्गदर्शनाखाली शनिवारपर्यंत ४८ हजार मालमत्तांना भेटी दिल्याची माहिती आहे. यादरम्यान, बाहेरगावाहून आलेल्या १ हजार ३०० नागरिकांची नोंद घेण्यात आली आहे.हातावर मारले शिक्केमनपाने गठित केलेल्या पथकाने मालमत्तांना भेटी दिल्यानंतर आढळून आलेल्या बाहेरगावच्या नागरिकांच्या हातावर प्रशासनाच्यावतीने शिक्के मारण्यात आल्याची माहिती आहे. संबंधित नागरिकांनी स्वत:साठी, कुटुंबीयांसाठी व समाजाच्या सुरक्षेसाठी काही दिवस घरातच थांबणे नितांत गरजेचे आहे.