त्याचबरोबर येथे वाढलेल्या काटेरी झुडपात, गवतात विषारी साप, विंचू दडून बसलेले आहेत. जे सर्पमित्राच्या साह्याने पकडण्यात आले आहे. त्याच्या माहितीनुसार सगळ्यात विषारी साप या परिसरात आहेत. त्यामुळे सर्पदंशाने जीवितहानी होऊ शकते. त्याचबरोबर या परिसरातील हा खुला भूखंड असल्यामुळे येथील नागरिक फेरफटका मारण्यासाठी येथेच येतात, तसेच याच ठिकाणी धार्मिक स्थान असल्यामुळे परिसरातील महिला येथे पूजाअर्चा करण्यास जात असतात. त्याचबरोबर वयोवृद्ध नागरिक येथे फेरफटका मारण्यास जातात व परिसरात दुसरीकडे कुठेही लहान मुलांना खेळण्यासाठी जागा नसल्यामुळे लहान मुलेसुद्धा येथेच खेळत असतात. त्यामुळे येथे सरपटणाऱ्या प्राण्यापासून कुणाच्याही जिवाला धोका असू शकतो. त्यामुळे राजगृह नगर येथील नागरिकांच्या समस्या पालिकेतर्फे तातडीने सोडविण्यात याव्यात, अशी मागणी येथील नागरिक करीत आहेत.
फोटो: