शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: एकनाथ शिंदे ठरले वरचढ, उद्धव ठाकरेंना मोठा फटका; ५१ पैकी केवळ १४ जागाच जिंकल्या
2
कोण १६२ मतांनी तर कोण २०८ मतांनी विजयी; 'या' जागांवर पाहायला मिळाली चुरशीची लढत!
3
एकनाथ शिंदेंना साथ देणारे हे आमदार झाले पराभूत, शहाजीबापूंसह या नेत्यांना बसला धक्का
4
महाराष्ट्रातील निकालांचा देशाच्या राजकारणावर किती परिणाम होईल? ६ मुद्द्यांमध्ये समजून घ्या
5
टी-२० मध्ये अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय ठरला हार्दिक पांड्या
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: महायुतीच्या बंपर विजयाचा संघाने रचला पाया; भाजपाने प्रचाराचा ट्रेंडच बदलला
7
"मी १० वी नापास झालो तेव्हा वडिलांनी केलेलं सेलिब्रेशन", अनुपम खेर यांनी सांगितला किस्सा
8
Maharashtra Assembly Election 2024 Results Highlights : "सर्व दिग्गज नेते एकाच वेळी पराभूत होतील असं होऊ शकत नाही, आम्हाला संशय..."
9
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 : भाजपातून शरद पवार गटात प्रवेश केलेल्या नेत्यांचं काय झालं? वाचा सविस्तर
10
'या' दोन नेत्यांनी भाजपच्या विजयात निभावली महत्त्वाची भूमिका, मध्य प्रदेशातही केली होती कमाल!
11
कश्मिरा शाहच्या नाकावरची पट्टी काढली, पोस्ट करत म्हणाली, "जखमेच्या खुणा..."
12
मविआचा सुपडा साफ, महायुतीनं सत्ता राखली; नवीन सरकारचा शपथविधी पुन्हा वानखेडेवर?
13
विधानसभा निवडणूक निकालानंतर तेजस्विनी पंडितच्या पोस्टने वेधलं लक्ष; म्हणाली, "आमचा राजा..."
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: बहिणींची मोठी साथ, जरांगे फॅक्टर निष्प्रभ; महाविकास आघाडीची पूर्णपणे धूळधाण
15
औक्षण करताना उडाला आगीचा भडका; नवनिर्वाचित आमदार थोडक्यात बचावले
16
कपूर कुटुंबात लग्नाची लगबग, पापाराझींसमोर पडता पडता वाचली करिष्मा; व्हिडिओ व्हायरल
17
आजचे राशीभविष्य - २४ नोव्हेंबर २०२४, मान व प्रतिष्ठा वाढेल, नोकरीत बढतीही होऊ शकते
18
यशस्वी भव:! सिक्सर मारत तोऱ्यात ठोकली सेंच्युरी; जैस्वालची खास क्लबमध्ये एन्ट्री
19
शरद पवारांचा पश्चिम महाराष्ट्र गड अखेर ढासळला; महायुतीने जिंकल्या ५८ पैकी ४६ जागा
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’ची मुसंडी, काँग्रेसचे पानिपत; उद्धवसेनेलाही साफ नाकारले

मूर्तिजापूर पंचायत समिती सभापती - उपसभापती पदासाठी होणार रस्सीखेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2022 4:40 PM

Murtajapur Panchayat Samiti : निवडणूक १६ रोजी दुपारी पंचायत समिती सभागृहात होऊ घातली आहे.

-संजय उमक मूर्तिजापूर : पंचायत समिती सभापती - उपसभापती निवडणूक १६ रोजी दुपारी पंचायत समिती सभागृहात होऊ घातली आहे. सभापती - उपसभापतीचा अडीच वर्षांचा कार्यकाळ संपुष्टात आल्याने ही निवडणूक घेण्यात येणार आहे; परंतु वंचित कडे व महाविकास आघाडीकडे समान सदस्य संख्या असल्याने या निवडणुकीत कमालीची रस्सीखेच होण्याचे चित्र आहे.                  मूर्तिजापूर पंचायत समिती सभापती - उपसभापती पदासाठी अनेक जण दावेदार आहेत, महाविकास आघाडीत ठरल्या प्रमाणे पहिली अडीच वर्षे कॉंग्रेसचा सभापती तर पुढची अडीच वर्षे राष्ट्रवादी साठी ठरले आहेत व पहिली अडीच वर्षे शिवसेनेचा उपसभापती तर उर्वरित अडीच वर्षे कॉंग्रेसचा उपसभापती असेल, सभापतीपद हे कॉंग्रेसकडे आहे. महाविकास आघाडीकडे ७ सदस्य आणि वंचित बहूजन आघाडीकडे ७ सदस्य असल्याने ही निवडणूक चुरशीची होणार आहे. महाविकास आघाडीत कॉंग्रेस ३, शिवसेना २, व राष्ट्रवादी काँग्रेसचे २ सदस्य आहेत. त्यामुळे पहिले अडीच वर्षे सभापती पदाची माळ कॉंग्रेसच्या उर्मिला डाबेराव यांच्या गळ्यात टाकण्यात आली. पुढील अडीच वर्षांसाठी राष्ट्रवादीला सभापती पद देण्यात येणार आहे,  आरक्षणानुसार सभापती पद अनुसचीत जाती करीता राखीव असल्याने राष्ट्रवादीकडे केवळ एकमेव ददादाराव किर्दक हे सदस्य असल्याने ते सभापती पदासाठी दावेदार आहेत तर उपसभापती कॉंग्रेसचा असणार आहे. त्यासाठी प्रकाश वाणरे आपले भाग्य अजमावणार आहेत. कॉंग्रेस कडे तीन अनुसूचित जातीचे सभासद आहेत तर वंचीतकडे आम्रपाली सचिन तायडे याच एकमेव दावेदार असल्याने वंचितचा सभापती पदाचा उमेदवार ठरला आहे. असे असले तरी दोन्ही कडील संख्याबळ समान असल्याने सभापती - उपसभापतीची निवड ईश्वर चिठ्ठी नेच होणार असल्याचे संकेत आहे.