संचालक मंडळाची मुदत १५ ऑक्टोबर २०२० रोजी संपुष्टात आली आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळास महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन (विकास व विनियमन) अधिनियम १९६३ कलम १४३ नुसार शासनास प्राप्त अधिकाराचा वापर करून ९ ऑक्टोबर २०२० रोजीच्या आदेशान्वये ६ महिने कालावधीसाठी म्हणजेच १५ एप्रिल २०२१ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. शासनाने २२ जानेवारी २०२०. रोजीच्या शासन आदेशान्वये राज्यातील ज्या
कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या संचालक मंडळाच्या निवडणुका आहेत, अशा कृषी
उत्पन्न बाजार समित्यांच्या संचालक मंडळाच्या निवडणुका २४ जानेवारी २०२१ पासून पुढील तीन महिन्यांच्या कालावधीसाठी पुढे ढकलण्यात आल्या आहेत. त्यामुळे मूर्तिजापूर बाजार समितीच्या संचालक मंडळास पुढील मुदतवाढ मिळण्यासाठी प्रस्ताव पणन संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांनी शासनास सादर केला होता. कोरोनाच्या गंभीर परिस्थितीमुळे निवडणुका नियत झालेल्या राज्यातील बाजार क्षेत्रात काम करण्याऱ्या कृषी पतसंस्था व
बहुउद्देशीय सहकारी संस्था यांच्या निवडणुका ३१ ऑगस्ट २०२१ पर्यंत पुढे ढकलण्यात आल्या आहेत.