अकोला: आॅगस्ट महिन्याच्या सुरुवातीला रुग्णवाढीचा वेग मंदावला होता; मात्र महिन्या अखेर रुग्णवाढीचा वेग पुन्हा वाढला असून, मूर्तिजापूर कोरोनाचे नवे केंद्र ठरत आहे. गत सात दिवसात सर्वाधिक ९९ रुग्ण मूर्तिजापूर तालुक्यात आढळून आले, तर एकाचा मृत्यू झाला.जिल्ह्यात कोरोनाचा धोका कायम असून, दररोज रुग्णसंख्या वाढ होत आहे. आॅगस्ट महिन्याच्या सुरुवातीला रुग्णवाढीचा वेग काही प्रमाणात कमी झाला होता. त्यामुळे अकोलेकरांना दिलासा मिळाला होता; मात्र आॅगस्टच्या शेवटच्या आठवड्यात रुग्णवाढीचा वेग पुन्हा वाढल्याचे दिसून येत आहे. गत सात दिवसात जिल्ह्यात ३४० पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले असून, त्यापैकी ७२ टक्के रुग्ण ग्रामीण भागातील आहेत. यामध्ये सर्वाधिक रुग्ण मूर्तिजापूर तालुक्यातील आहेत. मूर्तिजापूर तालुक्यात ९९ पॉझिटिव्ह रुग्ण, तर एकाचा मृत्यू झाला आहे. ग्रामीण भागात रुग्णवाढीचा वेग असाच कायम राहिल्यास परिस्थितीवर नियंत्रण मिळविणे शक्य होणार नाही. त्यामुळे आरोग्य यंत्रणेसमोरील आव्हान वाढले आहे.
मूर्तिजापूर ठरतोय कोरोनाचा नवा हॉटस्पॉट!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2020 5:51 PM