हिंदू संस्कृतीनुसार श्रावणातील नारळी पौर्णिमेला रक्षाबंधन हा सण साजरा केला जातो. बहीण भावाच्या मनगटावर राखी बांधून भावाच्या दीर्घ आयुष्यासाठी प्रार्थना करते. त्यासोबतच बहिणीच्या रक्षणाचे वचन भाऊ देतो. यंदा रक्षाबंधनाला पांढरे मोती, फॅन्सी जरी आणि जरदोजी राख्यांचीही खूप मागणी आहे. या राख्या दिसायला अत्यंत साध्या आणि सुंदर असतात. घुंघरू, लाख, राजस्थानी मिररवर्क आणि काचेची सजावट असलेल्या राख्या सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. लहान मुलांसाठी कार्टून राखी, लाइट लागलेल्या डिजिटल राख्या आल्या आहेत. त्यांची किंमत पन्नास रुपयांपासून ते दोनशे रुपयांच्या घरात आहे.
--------------
महागाईची झळ
तालुक्यासह जिल्ह्यात सार्वाधिक राख्या या नागपूर, गुजरात, मुंबई, राजस्थान येथून येतात; मात्र इंधन दरवाढीमुळे यंदा राख्यांची किंमत दहा टक्क्यांनी वाढल्या आहेत. दहा रुपयांपासून ते पाचशे रुपयांपर्यंतच्या राख्या बाजारात उपलब्ध आहेत. भगतसिंग चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, जुनी वस्तीसह शहराच्या विविध ठिकाणी दुकाने थाटली आहेत.