शहरं
Join us  
Trending Stories
1
'काकींना विचारणार, नातवाचा पुळका का आलाय?'; अजित पवारांना शरद पवारांनी दिले उत्तर
2
मनसे उमेदवाराला पाहताच कट्टर शिवसैनिकाच्या पत्नीला अश्रू अनावर; वरळीत काय घडलं?
3
विधानसभा निवडणूक निकालानंतर सत्तेसोबत जाणार, प्रकाश आंबेडकरांचे मोठे संकेत
4
शाहिद कपूरच्या ५०० कोटींचा सिनेमा 'अश्वत्थामा'ला लागला ब्रेक! मोठं कारण आलं समोर
5
मुंबईतील २६/११ हल्ल्याचा मास्टरमाईंड बिनधास्त फिरतोय; पाकिस्तान जगाची दिशाभूल करतंय
6
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
7
हृदयद्रावक! ओव्हरटेक करताना क्रेटाची ऑटोला धडक; अपघातात वधू-वरांसह ७ जणांचा मृत्यू
8
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
9
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
10
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
11
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
12
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
13
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
14
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
15
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
16
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
17
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
18
‘एक्स’वर १.१५ लाख युजर्सची फुली; अमेरिकी निवडणुकीत ट्रम्पना पाठिंबा देणे मस्क यांना महागात
19
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
20
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक

मूर्तिजापूर : एसटीच्या संपामुळे प्रवाशांची तारांबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2017 7:29 PM

‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ असे ब्रीद असलेल्या एसटी कर्मचारी संघटानांनी धनत्रयोदशीपासून सुरू केलेल्या संपामुळे प्रवाशांची तारांबळ उडाली. खासगी प्रवासी वाहतूक करणार्‍यांनी या संधीचा फायदा घेऊन दिवाळी साजरी केल्याचे म्हटल्या जात आहे.

ठळक मुद्देधनतेरसच्या दिवशी एसटीच्या तिजोरीत खडखडाटखासगी वाहतूकदारांनी उचलला संपाचा फायदा

लोकमत न्यूज नेटवर्कमूर्तिजापूर : दीपावलीच्या पर्वावर आपल्या गावाकडे परतणार्‍या चाकरमान्यांसह सासरहून माहेरी जाणार्‍या नवविवाहिता, विवाहितांसह मामाच्या गावाला जाण्याची ओढ असलेल्या बच्चे कंपनीमुळे बसस्थानके गर्दीने फुलून जातात. एसटी विभागाच्या उत्पन्नातील घट भरून काढण्यास दीपावली सणानिमित्त प्रवास करणार्‍या प्रवाशांच्या वाढणार्‍या गर्दीचा मोठा हातभार लागतो. प्रवासी सर्वात पहिली पसंती एसटी प्रवासालाच देतात. त्यामुळे एसटीने आपले स्थान प्रवासी वर्गात टिकवून ठेवले आहे. ‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ असे ब्रीद असलेल्या एसटी कर्मचारी संघटानांनी धनत्रयोदशीपासून सुरू केलेल्या संपामुळे प्रवाशांची तारांबळ उडाली. खासगी प्रवासी वाहतूक करणार्‍यांनी या संधीचा फायदा घेऊन दिवाळी साजरी केल्याचे म्हटल्या जात आहे.एसटी कर्मचार्‍यांचा संप सुरू असल्याने स्थानिक बसस्थानकावरून सुटणार्‍या बसफेर्‍या सकाळपासून बंद होत्या. मूर्तिजापूर येथे मुंबई-हावडा लोहमार्गाचे जंक्शन रेल्वे स्टेशन आहे. त्यामुळे कारंजा, दारव्हा, यवतमाळ, दर्यापूर, अंजनगावसह तालुक्यातील ग्रामीण क्षेत्रातील प्रवाशांची येथे मोठी गर्दी झाली होती. एसटीचा संप असल्याने या प्रवाशांची तारांबळ उडाली व मनस्ताप सहन करावा लागला. खासगी वाहनाने घर गाठण्याकरिता दुप्पट तिकीट द्यावे लागले. संपामुळे बसस्थानकावर शुकशुकाट होता. खासगी वाहतूकदारांनी या संधीचा फायदा करून घेतला. कारंजा, दर्यापूर या ठिकाणी जाण्यासाठी दुप्पट पैसे मोजावे लागल्याचे प्रवाशांनी सांगितले. संपूर्ण कुटुंबासह गावाकडे जाणार्‍या प्रवाशांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले. सदर संपामुळे मूर्तिजापूर आगाराच्या ६0 पेक्षा अधिक बसफेर्‍या रद्द झाल्या. दररोज विविध ठिकाणांवरून येणार्‍या-जाणार्‍या २00 पेक्षा अधिक बसफेर्‍या रद्द झाल्या. दीपावलीच्या सणानिमित्त ग्रामीण भागातून खरेदीकरिता येणारे गावकरी, शाळकरी, विद्यार्थी यांची कुचंबणा झाली. आगाराचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. एसटी कर्मचार्‍यांच्या वेतनात वाढ झाली पाहिजे, त्यांच्या समस्यांचा निपटारा झाला पाहिजे; परंतु दीपावली या महत्त्वपूर्ण सणाच्या काळात संप करणे कितपत योग्य आहे, असा प्रश्न प्रवासी वर्गात चर्चिल्या जात होता. 

दिवाळीचा सण गावावरून मुलगा, मुलगी, नातू, भाऊ, बहीण, आत्या, मावशी, काका-काकू अशी नात्यातील माणसे येणार म्हणून सर्वत्र उत्साह आणि आनंदाचे वातावरण आहे; परंतु ऐनवेळी एसटीचा बेमुदत संप सुरू झाल्याने सणासाठी नात्यातील माणसे वेळेवर पाोहोचतात की नाही, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. एसटीच्या संपामुळे खासगी वाहतूकदारांचा फायदा होत आहे.- श्रीकृ ष्ण रा. गवई, प्रवासी, खापरवाडा.

टॅग्स :state transportराज्य परीवहन महामंडळ