- संजय उमकमूर्तिजापूर : तालुक्यातील २९ ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुका नुकत्याच पार पडल्या. पैकी १५ ग्राम पंचायतींच्यासरपंच व उपसरपंच पदाच्या निवडणुका ११ फेब्रुवारी रोजी निवडणूक घेण्यात आली. ८ सरपंच व १० उपसरपंचाची बिनविरोध निवड झाली. १० ठिकाणी महिला सरपंच व ६ ठिकाणी महिला उपसरपंच झाल्या. तालुक्यातील ८६ पैकी ४४ ग्रामपंचायतींचे महिला सरपंचपद महिलांसाठी राखीव ठेवण्यात आले आहे. यावेळी निवडणूक झालेल्या २९ ग्रामपंचायतींपैकी सोनोरी (बपोरी) व मोहखेड या दोन ग्रामपंचायतींची निवडणूक बिनविरोध होऊन, गेल्या १५ जानेवारीला २७ ग्रामपंचायतींची निवडणूक पार पडली. १४ ग्राम पंचायतींच्या सरपच व उपसरपंच पदाची निवडणूक ९ फेब्रुवारी रोजी पार पडली. उर्वरित १५ ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच पदासाठी गुरुवारी निवडणूक घेण्यात आली. या निवडणूक प्रक्रियेनुसार कवठा सोपीनाथच्या सरपंचपदी अतुल सुभाषराव बाजड व उपसरपंचपदी शुभांगी प्रशिक मेश्राम यांची निवड झाली. जामठी बुद्रुकच्या सरपंचपदी अर्चना संदीप तायडे व उपसरपंचपदी विलास अवधूत गुल्हाने यांची निवड झाली. धामोरी बुद्रुकचे सरपंच पुष्प सतिश निलखन, उपसरपंच विजय पांडूरंग चतुरकर, कार्ली सरपंच लताताई ज्ञानेश्वर विटीवाले व उपसरपंच प्रभाताई भगवान वानखडे, राजुरा घाटे सरपंच बंडू रामभाऊ घाटे व उपसरपंच रमेश झिंगाजी इंगळे, खांदला सरपंच सविता राजकुमार पंडीत व उपसरपंच माधुरी विलास पिंगळे, धानोरा पाटेकर सरपंच मोनिका अक्षय म्हसाये व उपसरपंच मंगला देवानंद उके, निंभा सरपंच जयश्री प्रदीप फुके व उपसरपंच अनुप प्रभाकर चंदुुले, विराहीत सरपंच ज्ञानेश्वर लक्ष्मण पाटील व मनोज अरुण राऊत, मोहखेड सरपं सुवर्णा चंद्रशेखर लांडे व उपसरपंच श्रीधर अनिल कांबे, कंझरा सरपंच अनिता चंद्रकात टोम्पे व उपसरपंच निलेश शंकरराव गिरी, अनभोरा सरपंच चंद्रकला श्रीराम भगत व उपसरपंच पंचफुला रामदास जाधव व, हातगाव सरपंच अक्षय जितेंद्र राऊत व उपसरपंच वंदना विजय अनभोरे, चिखली सरपंच किशोर देवराव राऊत व उपसरपंच किरण प्रदीप सवाई, आणि बपोरीच्या सरपंचपदी मोनिका पंकज खंडारे व उपसरपंचपदी राम बाबुराव खंडारे हे विराजमान झाले आहेत. या निवडणुकांचे अध्यासी अधिकारी म्हणून मंडळ अधिकारी रामराव जाधव, विस्तार अधिकारी पंडित राठोड, बंडू पजई, सुरेश तिजारे, मंडळ अधिकारी अनिल बेलाडकर, विस्तार अधिकारी विलास चव्हाण, मंडळ अधिकारी महेश नागोलकर, विस्तार अधिकारी मनोज बोपटे, युवराज अंभोरे, विजय किर्तने, मंडळ अधिकारी सुनिल डाबेराव, रावसाहेब पाटेकर, सदानंद देशपांडे, राजेंद्र जाधव, मानोहर ननीर यांनी काम पाहिले. या ग्रामपंचायतीचे सरपंच व उपसरपंच झाले बिनविरोधधामोरी बु, कार्ली, निंभा, विराहीत, मोहखेड, कंझरा, अनभोरा, चिखली येथील सरपंच तर धामोरी, कार्ली, राजुरा घाटे, खांदला, निंभा, विराहीत, मोहखेड, कंझरा, अनभोरा, चिखली येथील उपसरपंच अविरोध निवडून आले आहेत.
मूर्तिजापूर तालुक्यात ८ सरपंच व १० उपसरपंच बिनविरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2021 7:21 PM
Sarpanch Election तालुक्यातील २९ ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुका नुकत्याच पार पडल्या.
ठळक मुद्दे१० ठिकाणी महिला सरपंच व ६ ठिकाणी महिला उपसरपंच झाल्या.सरपंच, उपसरपंच पदासाठी गुरुवारी निवडणूक घेण्यात आली.