तालुक्यातील ८६ पैकी ४४ ग्रामपंचायतींचे महिला सरपंचपद महिलांसाठी राखीव ठेवण्यात आले आहे. यावेळी निवडणूक झालेल्या २९ ग्रामपंचायतींपैकी सोनोरी (बपोरी) व मोहखेड या दोन ग्रामपंचायतींची निवडणूक बिनविरोध होऊन गेल्या १५ जानेवारीला २७ ग्रामपंचायतींची निवडणूक पार पडली. १४ ग्रामपंचायतींच्या सरपंच व उपसरपंचपदाची निवडणूक ९ फेब्रुवारी रोजी पार पडली, उर्वरित १५ ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंचपदासाठी गुरुवारी निवडणूक घेण्यात आली. या निवडणुकीत सर्वांत कमी वयाचे सरपंच म्हणून लाखपुरी येथील अजय जयदेवराव तायडे यांना मिळाला असून, २३ वर्षांचे तरुण लाखपुरी सरपंचपदावर विराजमान झाले, तर त्याच पाठोपाठ हातगाव सरपंच अक्षय जितेंद्र राऊत व धानोरा पाटेकर येथील मोनिका अक्षय म्हसाये हे केवळ २५ व्या वर्षी सरपंचपदी आरूढ झाले. यामध्ये २३ ते ३५ वर्षे वयोगटातील १२ सरपंच व ११ उपसरपंचांचा समावेश आहे. यामध्ये लाखपुरी अजय जयदेवराव तायडे (२३), हातगाव अक्षय जितेंद्र राऊत (२५), धानोरा पाटकर मोनिका अक्षय म्हसाये (२५), कवठा खोलापूर आरती प्रफुलराव देशमुख (३०), निंभा जयश्री प्रदीप फुके (३०), जामठी बु. अर्चना संदीप तायडे (३१), धामोरी बु. पुष्पा सतीश निलखन (३२), बपोरी मोनिका पंकज खंडारे (३२), मोहखेड सुवर्णा चंद्रशेखर लांडे (३२), खांदला सविता राजकुमार पंडित (३३), कवठा सोपीनाथ अतुल सुभाष बाजड (३५), हिरपूर अमोल छत्रपती गडवे (३५), टिपटाळा जयश्री सुनील डोंगरे (३६), सांगवी अर्चना दिलीप खोकले (३७), सिरसो जयकुमार महादेवराव तायडे (३७), पारद विनोद नारायण मानकर (३७), गोरेगाव यशोदा देवानंद सरदार (३८), कुरुम अतुल दादाराव वाट (४०) हे सरपंच म्हणून विराजमान झाले आहेत, तर उपसरपंच पारद चंदा नाजूक खंडारे (२९), दुर्गवाडा चित्रा सतीश पंडित (२७), कवठा सोपीनाथ शुभांगी प्रसिक मेश्राम (२६), हिरपूर काजोल रवींद्र शिंदे (२७), गोरेगाव शेख निकत अंजूम बयाजोद्दीन (३०), सांगवी प्रशांत सुरेशराव खांडेकर (३६), टिपटाळा प्रियंका अमोल गावंडे (३०), खांदला माधुरी विलास पिंगळे(३९), निंभा अनुप प्रभाकर चंदुले (३३), विराहित मनोज अरुण राऊत (३७), मोहखेड श्रीधर अनिल कांबे(३१), धानोरा पाटेकर मंगला देवानंद उके (४०), कंझरा नीलेश शंकरराव गिरी (४०) या नवख्या व तरुणाईला संधी देण्यात आली असली तरी मिळालेल्या संधीचे काय फलित करून घेतात याकडेच गावकऱ्यांचे लक्ष लागून आहे. यातील अनेक सरपंच, उपसरपंच अविवाहित असल्याने गावाचा कारभार कशा पद्धतीने हाकतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
मूर्तिजापूर तालुक्यातील ग्रामपंचायतची धुरा तरुणाईच्या खांद्यावर!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 04, 2021 4:34 AM