मूर्तिजापूर: मूर्तिजापूर मतदारसंघाने सलग तिसऱ्यांदा कोणालाही संधी दिलेली नाही त्यामुळे यावेळी हॅटट्रिकच्या उंबरठ्यावर असलेल्या आ. हरीश पिंपळे यांना संधी मिळणार की हुकणार, यावर इतिहास घडेल. आज होणाºया मतमोजणीतून लवकरच मतदारसंघाचे चित्र स्पष्ट होणार आहे.मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघात विद्यमान आमदार हरीश पिंपळे, राष्ट्रवादीचे रवी राठी आणि वंचित बहुजन आघाडीच्या प्रतिभा अवचार यांच्यातच तिरंगी लढत झाली आहे, कोण कुणाचे किती मते कमी करतो, त्यावर विजयाचे गणित ठरणार आहे. आज मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर हरीष पिंपळे गड राखतात की लवकरच चित्र स्पष्ट होणार आहे.या मतदारसंघाचे १९६२ मध्ये कुसुमताई कोरपे, १९७२ मध्ये प्रतिभाताई तिडके या दोन महिला आमदारांनी प्रतिनिधित्व केले आहे. यावेळी वंचितने प्रतिभा अवचार यांच्या रूपाने सक्षम आव्हान दिले आहे. त्यामुळे त्याचा विजय झाला तर तोही इतिहास ठरेल.दुसरीकडे प्रचारात घेतलेली प्रचंड आघाडी, मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी केलेली धडपड, नव्या दमाचा कार्यकर्ता, विद्यमान आमदाराप्रती असलेल्या नाराजीचा फायदा मिळाल्यास रवी राठी तसेच एक गठठा मते घेऊन इतरांच्या मतविभाजनात वंचित बहुजन आघाडीच्या उमेदावार प्रतिभा अवचार ह्या सुद्धा करिष्मा करू शकतात. मतदानाची कमी झालेली टक्केवारी त्यांच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. या अगोदरसुद्धा अवचार यांनी २००९ मध्ये निवडणूक लढवली होती. त्या वेळेस त्यांना ३४ हजार ६३१ मते मिळाली होती. यावेळी पक्षांतर्गतसुद्धा बंडखोरी अथवा गटबाजी सामना त्यांना करावा लागला नसल्याने महिला सक्षम उमेदवार म्हणून त्यांच्या लढतीकडे पाहिल्या जाते.
मुर्तीजापूर निवडणूक निकाल : पिंपळे हॅटट्रिक साधणार की वंचित’, राष्ट्रवादी बाजी मारणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2019 7:32 AM