अकोला- देशासाठी प्राणाची आहुती देण्याची परंपरा आपली आहे, असे प्रति पादन उपविभागीय महसूल अधिकारी प्रा. संजय खडसे यांनी केले. रविवारी उर्दू एकता मंच व कुल हिंद बाजमी ए अदब वो सकाफात यांच्यावतीने ‘एक शाम शहीदो के नाम’ या मुशायरात्मक कार्यक्रमात ते बोलत होते. आ. गो पीकिशन बाजोरिया यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाला विजयकां त सागर, विजय देशमुख, साजिद खान पठाण, मंजूर नदीम , मो. इरफान, डॉ.शैलेश देशमुख, हाजी मुदाम, शेख साबीर, अँड. इब्राहिम सिद्धीकी, मो.फजलू , प्रदीप वखारिया आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आयोजन आरीफुरहेमान, अमीन खान लोधी, मेहमूद खान पठाण, सय्यद सम्मीर, मोहम्मद रिजवान, अलियार खान, मोहसिन अहमद, सय्यद नाजिम, अकबर अली, मोहम्मद आदिल, मुजामिल शेख, हन्नजाल अमी अली, मोहम्मद शरीक यांनी केले होते. सर्वप्रथम प्रशांत, संजय खंडारे, आनंद गवई, मुजीब, सलाम कुरेशी, सुमेध गवई या अकोल्यातील शहिदांच्या कुटुंबीयांचा मान्यवरांच्या हस्ते स्मृतिचिन्ह, शाल देऊन गौरव करण्यात आला. यावेळी शहिदांना सामूहिक श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर महेंद्र गवई यांनी उपस्थितांना संविधानाची शपथ दिली.
आ. बाजोरिया यांनी शहिदांच्या सन्मानार्थ उर्दू एकता मंचने शहीद रॅली काढून खर्या अर्थाने आदरांजली दिल्याचे ते बोलले. आधार रुग्णालयाचे संस्थापक डॉ. दिलावर खान यांनी जिल्ह्यातील शहिदांच्या कुटुंबीयांना रुग्णालयाच्यावतीने मोफत उपचार पुरविण्याची घोषणा करीत त्यांना सेवाकार्ड वितरित केले. या सोहळ्यानंतर मुशायरा झाला. ख्यातनाम शायर मुंबईचे शकील आझमी, इम्रान रिफत, भोपाळ चे डॉ. नुसरत मेहदी, अमरावतीचे अबरार कासिफ, खंडवाचे सुफियान काझी आदींनी उत्कृष्ट शायरी सादर करून देशभक्तीपर वातावरणाची निर्मिती केली. स्वागत उर्दू शिक्षक संघाचे जव्वाद हुसेन यांनी केले. सोहळ्याचे संचालन नईम फराज यांनी, तर आभार साजिद मेहसर यांनी मानलेत. व्यवस्था पन अल्तमश शम्स, साजिद मेहसर, नईम फराज,अनास नबील, एजाज बिस्मिल आदींनी केले. यावेळी जावेद जकारिया, अब्दुल रौफ, राजू नाईक, सरदार खान, कवी घनश्याम अग्रवाल, दीपक गोयनका, प्रकाश पुरोहित, बाबर, मो.युसूफ, मो.इलियास, अफरोज लोधी, जावेद तेली समवेत महानगरा तील नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते .