अकोला : सध्या जागतिक पातळीवर खाद्यतेल आणि तेलबियांना चांगला दर मिळतोय. शहरातील बाजार समितीत कमी प्रमाणात मोहरीची आवक आहे. शनिवारी मोहरीला जास्तीत जास्त ५ हजार १०० रुपये प्रति क्विंटल दर मिळाला. तर कमीत कमी ४ हजार ८००, सर्वसाधारण ४ हजार ९५० रुपये दर मिळाला. -------------------------------------
पर्यायी मार्ग बंद
अकोला : शहरातील जुनेगाव, बाळापूर नाका रस्त्याकडे जाणारे काही जण पोलीस तैनात असलेले ठिकाण चुकविण्यासाठी राजेश्वर सेतूच्या पर्यायी मार्गाचा वापर करत होते; मात्र शनिवारी पोलिसांनी हा मार्ग बंद केला. त्यामुळे वाहनचालकांना पोलिसांच्या तपासणीतून जावे लागले.
------------------------------------------
बागायती पिकांना उन्हाचा फटका
अकोला : एप्रिल महिना सुरू होताच उन्हाचा पारा वाढला आहे. यामुळे बागायती पिकांना फटका बसला आहे. शेतात उन्हाळी पिके उभी असून हिरव्यागार पिकांवर उन्हाचा तडाखा बसल्याने करपल्याच्या स्थितीत आहे. ढगाळ वातावरणामुळे काही काळ सावली राहत आहे.
--------------------------------------------
शेतकऱ्यांनी धरली तंत्रज्ञानाची कास
अकोला : जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरली आहे. अनेक शेतकरी नवनवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करीत शेती कसत आहे. शेत तयार करण्यापासून ते पीक काढणीपर्यंत विविध मशीनचा वापर सुरू आहे.
---------------------------------------------
यावर्षी हमीभावाने हरभरा खरेदी अधिक!
अकोला : शासनाच्या हमीभाव केंद्राकडून गेल्यावर्षी केवळ ३० टक्के शेतकऱ्यांकडून हरभरा खरेदी करण्यात आला होता. यावर्षी जास्त प्रमाणात हरभरा खरेदी झाला आहे. चुकारे लवकर मिळत असल्याने अनेक शेतकऱ्यांचा हमीभाव केंद्राकडे कल आहे.