शहरं
Join us  
Trending Stories
1
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
2
उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे आणि सुनील प्रभूंवर सोपवली मोठी जबाबदारी, या पदांवर केली नियुक्ती 
3
पुन्हा पक्षफुटीची भीती? उद्धव ठाकरेंची खास रणनीती, नव्या २० आमदारांना शपथबद्ध करणार!
4
"अजित पवार यांना मुख्यमंत्री, तर मला मंत्री करा’’, राष्ट्रवादीच्या आमदाराने व्यक्त केली इच्छा
5
थोरातांच्या पराभवानंतर सत्यजित तांबे अजित पवारांच्या भेटीला; म्हणाले, "त्यांच्यासारखा माणूस..."
6
"बिहार खड्ड्यात गेलाय’’, पोटनिवडणुकीतील पराभवानंतर प्रशांत किशोर यांची प्रतिक्रिया 
7
IND vs AUS :आम्ही दबावात होतो; पण... बुमराहनं शेअर कमबॅक मागची स्टोरी
8
विदर्भातील 'या' १२ आमदारांना मतदारांनी नाकारले; महायुतीच्या आमदारांनाही दिला झटका 
9
पेन्शनधारकांनो, नो टेन्शन; हयातीचा दाखला मिळणार घरपोच!
10
IPL Auction 2025: "थोडे जास्तच पैसे गेले, आम्ही रिषभ पंतसाठी..."; LSGच्या मालकांनी सांगितला 'फसलेला' प्लॅन
11
Gold Silver Price Today : सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; पटापट चेक करा दिल्ली ते कोलकात्यापर्यंतचे दर
12
"कुटुंबात 4 जण, मतं मिळाली फक्त 2", 'तो' व्हिडीओ शेअर करत अभिनेत्यानं EVM वर घेतला संशय
13
लाडक्या बहिणींना पहिला हप्ता कधी येणार? १५०० की २१०० रुपये...; दिवाळी बोनस मिळणार की नाही...
14
मला फक्त विधानपरिषद नको, गृह किंवा अर्थखातं हवं; लक्ष्मण हाकेंची महायुतीकडे मागणी
15
Video: उच्चशिक्षित इंजिनीअर, प्रेयसीच्या विरहात बनला भिकारी; अवस्था पाहून लोकंही हळहळले
16
Maharashtra Vidhan Sabha Elecation 2024: नाना पटोलेंवर प्रफुल्ल पटेल वरचढ!
17
Arvind Kejriwal : अरविंद केजरीवालांची खेळी, वृद्धांसाठी मोठी घोषणा, दरमहा मिळणार 'इतकी' पेन्शन!
18
उर्वशी रौतेलाने सांगितलं अद्याप अविवाहित असल्याचं कारण; म्हणाली, "माझ्या जन्म पत्रिकेत..."
19
मुख्यमंत्र्यांच्या विरोधात निवडणूक लढविली, तोच उमेदवार शिंदे गटात जाणार; लता शिंदेंच्या उपस्थितीत घोषणा
20
भारतात ईव्हीएम हवे की, बंद व्हावे? बघा सर्व्हे काय सांगतो?

माय बापहो, लेकरं सांभाळा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2017 2:46 AM

शाळकरी-महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या भरकटलेल्या पाऊलवाटा.

संजय खांडेकर अकोला, दि. १८- प्रेम करणे गुन्हा नाही; परंतु अभ्यास करून भविष्य घडविण्याच्या वयात अभ्यास सोडून एकांत शोधण्याचे प्रमाण महाविद्यालयीन युवकांसह अगदी शालेय विद्यार्थ्यांमध्ये वाढले आहे. शहराजवळील निर्माणधिन असलेल्या वसाहतीत, शहराबाहेरच्या झाडाझुडुपात अश्लील चाळे करीत बसणे,असे प्रमाण वाढले आहेत. अशा प्रकारांमुळे अनेकदा सामूहिक बलात्कार आणि ब्लॅकमेलिंगसारख्या जीवघेण्या घटनांचाही जन्म होतो. शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थी-विद्यार्थिनींच्या या बेताल वर्तणुकीमुळे अनेक सामाजिक प्रश्न निर्माण होत आहे. अशा घटनांचा वेध घेण्यासाठी ह्यलोकमतह्णने शहराजवळच्या निर्माणधिन असलेल्या वसाहतीत आणि निर्मनुष्य असलेल्या परिसरात भेटी देऊन पाहणी केली. काही हादरविणारी चित्रे कॅमेराबद्ध केली. अत्यंत किळसवाणे चित्र पाहण्यास मिळाले.त्यातील काही प्रातिनिधीक छायाचित्र प्रकाशित केली आहेत.शाळा-महाविद्यालयाच्या नावाने घरून निघालेली, नुकताच वयात आलेली मुलं खरंच शाळा-महाविद्यालयात जातात का, की नको ते उद्योग करतात. हे पाहण्याची वेळ आता अकोल्यातील पालकांवर आली आहे. मैत्रीच्या माध्यमातून मोबाइल, व्हॉट्सअँपवर झालेली जवळीकता मुलांना नंतर शारीरिक आकर्षणाकडे ओढून नेते. मग, हव्याशा वाटणार्‍या सहवासाने एकांतवासाच्या शोधात ही मैत्री पुढे जाते, कळत नकळत भरकटलेल्या पाऊलवाटा नको त्या वयात नको ते करायला लावतात. अकोला शहरालगत असलेल्या एकांतवासातील वसाहती, पडक्या इमारती, बागा, झुडुपे, नाल्यांचा उपयोग ही मंडळी घेत असल्याचे चित्र समोर आले आहे. अकोला शहराबाहेर असलेल्या एकांतवासातील वसाहती आणि झाडा-झुडुपातील परिसर शाळकरी आणि महाविद्यालयीन मुलांच्या स्वैराचाराचे अक्षरश: कुरण झाले आहे.व्याळा मार्गावरील नरहर शेट्टीवार यांच्या गजानन नगरी परिसरात, त्या बाजूच्या अन्नपूर्णा नगरी परिसरात, जाजू नगरीच्या पलीकडील नाल्यात, गायगाव मार्गावरील रेल्वे लाइनवर, पातूर मार्गावर, मलकापूरकडून निघणार्‍या औद्योगिक वसाहत परिसरात, विमानतळाच्या भोवती, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठच्या आतील परिसरात, शाळा-महाविद्यालयीन किशोरवयीन मुले अश्लील चाळे करताना आढळतात. बीभत्स आणि तेवढीच अस्वस्थ करणारी वस्तुस्थिती ह्यलोकमतह्णने कॅमेराबंद केली आहे. उपरोक्त ठिकाणी वसाहती भोवती फारशी सुरक्षा व्यवस्था नसल्याने जवळपास वाहने ठेवून ही मंडळी शिरकाव करते. वसाहतींचे मालक आणि शहरातील सामाजिक संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी चुप्पी साधली आहे.शाळा-महाविद्यालयांच्या वेळातच वावरशाळा-महाविद्यालयांच्या नावे घरून निघालेली मुले नेमक्या शाळा-महाविद्यालयाच्या तासिका वेळात शहरालगत असलेल्या एकांतवासात वावरतात. जर मुले शाळा-महाविद्यालयात नसतील, तर पालकांनी आपल्या पाल्याची सखोल चौकशी करणे गरजेचे आहे.कृषी विद्यापीठ परिसरात मुक्त संचारडॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचा परिसर दूरपर्यंत विस्तारलेला आहे. प्रशासकीय इमारतीच्या लगत निघणार्‍या पाऊलवाटेने बांबूंचे वन लागते. कालवाजवळ असलेल्या या बांबू वनात पडलेले आक्षेपार्ह साहित्य मुक्त संचार असल्याच्या खाणाखुणा देतात.जाणीव आहे आम्हाला..आपलं बाळ रडलं तरी आपण अस्वस्थ होतो. त्याला ठेच लागू नये, त्याचं पाऊल वाकडं पडू नये, हे प्रत्येक पालकाला वाटते. कधीकाळी बोट धरून शिकविलेली मुलं भरकटली तर. अनेक संकटे ओढविल्या जाण्याची शक्यता आहे. आपल्या पाल्यांना वेळीच हात देण्यासाठी, त्यांना सावरण्यासाठी .. आपण वेळीच जागरूक व्हावे, त्यासाठीच हा खटाटोप.