अकोला : संत गजानन महाराज प्रगटदिनाचे औचित्य साधत दरवर्षी शेकडो ठिकाणी महाप्रसादाचे कार्यक्रम होत असतात. हजारो भाविक अकोला ते शेगाव पायदळ वारी करतात, या वारकऱ्यांसाठी वारी मार्गावरही महाप्रसादासह चहा, पाणी, फराळाची व्यवस्था भाविकाच्या वतिने श्रद्धेतून करण्यात येते. भाविकांच्या सुविधेसाठी व श्रद्धेतून हा उपक्रम राबविला जातो मात्र यामधून उरलेल्या तसेच उष्टा टाकलेल्या अन्नाची नासाडी होत असल्याचीही बाब समोर आली आहे. हजारो भाविक महाप्रसाद व खाद्य पदार्थ घेतात अन् थोडेस खाऊन टाकून देतात. या प्रकारा थांबवा, प्रत्येक भक्ताने आवश्यकतेनुसारच घ्यावे, उरलेल्या अन्नाची योग्य विल्हेवाट लावावी याकरीता जनजागृती करण्यासाठी माझी वारी, स्वच्छ वारी अभियान येथील युवकांनी हाती घेतली आहे. संवेदना क्रिएटीव्ह क्लब, प्रेरणा प्रतिष्ठान, मास्टर्स अॅथलेटीक असोशिएशन, प्रभात किडस्, पॅरामाऊंट स्पोटर्स, अस्पायर इन्स्टिट्यूट, करूणा भूमि चॅरिटेबल ट्रस्ट पांजरापोळ, राम क्रियेएशन अशा संस्थाच्या संयुक्त विद्यमाने ही वारी आयोजीत केली आहे. यामध्ये १७ फेब्रुवारी ह्यउष्टे टाकू नकाह्ण जनजागृतीला गायगाव येथील गणेशमंदिरावरून सकाळी ११ वाजता प्रारंभ होणार आहे, दूपारी ३ ते रात्री ९पर्यंत माहिती पटाचे प्रदर्शन तर १८ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजेपासून गायगाव येथील मंदिराजवळून स्वच्छता अभियान सुरू करणार आहेत. या अभियानामध्ये महाप्रसाद वाटप करणाऱ्यांना डस्टबीन देण्यात येणार असून मोफत आरोग्य तपासणी,औषधोपचार शिबिरांचीही जोड दिली जाणार आहे. या अभियानाला भक्तांनी सहकार्य करून अन्नाची नासाडी थांबवावी असे आवाहन या संस्थाच्या वतिने करण्यात आले आहे.
माझी वारी, स्वच्छ वारी अभियान : स्वच्छतेसह करणार जनजागृती
By admin | Published: February 15, 2017 7:55 PM