लोकमत न्यूज नेटवर्कमूर्तिजापूर : मूर्तिजापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये किमान आधारभूत किंमत योजनेंतर्गत नाफेडच्यावतीने ५ फेब्रुवारी रोजी विदर्भ को-ऑप. मार्केटिंग फेडरेशनद्वारा सन २0१७-१८ मध्ये उत्पादित तूर खरेदीचा शुभारंभ करण्यात आला.सदर खरेदी केंद्रावर खरेदी-विक्री संस्थेचे अध्यक्ष अ.सु. तिडके यांच्या हस्ते काटा पूजन करण्यात आले. यावेळी बाजार समितीचे सभापती सु.भ.तिडके, संचालक ठाकरे, खरेदी-विक्री संस्थेचे उपाध्यक्ष अ.प्र.लोडम, बा.पु.महल्ले, तसेच व्ही.सी.एम.एफ.चे जिल्हा विपणन व्यवस्थापक वाघ, संजय भुईभार, अशोक भुईभार, बाजार समितीचे सचिव रितेश मडगे, खरेदी-विक्री व्यवस्थापक धि.ना. मुले व सर्व कर्मचारी उपस्थित होते.यावेळी तूर पिकासाठी आधारभूत दर प्रति क्विंटल ५,२५0 रुपये अधिक २00 रुपये बोनस याप्रमाणे जाहीर करण्यात आला आहे. यामुळे शेतकर्यांनी त्यांच्या तूर विक्रीसाठी नाफेडच्या ई-पोर्टलवर नाव नोंदणी करावी, एका शेतकर्याकडून एका दिवशी फक्त २५ क्विंटल (५0 किलोच्या ५0 बॅग ) याप्रमाणे खरेदी करण्यात येईल. शासनाने ठरवून दिलेल्या एकरी ३.५0 क्विंटल या एकरी उत्पादकतेच्या निकषानुसार तूर खरेदी करण्यात येईल. शेतकर्यांकडून फक्त एफ.ए.क्यू. दर्जाची तूरच खरेदी करण्यात येईल, तसेच आर्दतेचे प्रमाण १२ टक्केपेक्षा जास्त असू नये, आपला माल वाळवून, सुकवून व चाळणी करून खरेदी केंद्रावर आणावा, खरेदी केंद्रावर तूर आणताना सोबत सात-बाराचा मूळ उतारा आणणे आवश्यक आहे, असे जिल्हा विपणन व्यवस्थापक व्ही.बी.वाघ यांनी सांगितले.
मूर्तिजापूर येथे नाफेडचे तूर खरेदी केंद्र सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 05, 2018 8:09 PM
मूर्तिजापूर : मूर्तिजापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये किमान आधारभूत किंमत योजनेंतर्गत नाफेडच्यावतीने ५ फेब्रुवारी रोजी विदर्भ को-ऑप. मार्केटिंग फेडरेशनद्वारा सन २0१७-१८ मध्ये उत्पादित तूर खरेदीचा शुभारंभ करण्यात आला.
ठळक मुद्देतूर पिकासाठी आधारभूत दर : प्रति क्विंटल ५,२५0 रुपये अधिक २00 रुपये बोनस जाहीरतूर विक्रीसाठी शेतकर्यांना नाफेडच्या ई-पोर्टलवर नाव नोंदणी करावी लागणार