राज्यातील नगर परिषदांमध्ये रोजंदारी कर्मचारी यांचे विनाअट समावेशन करणे, सहाय्यक अनुदान ऐवजी शंभर टक्के वेतन शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे कोषागार मार्फत देणे. सातव्या वेतन आयोगाचे थकीत हप्ते रोखीने देणे, दहा वीस तीस वर्षाची आश्वासित प्रगती योजना विनाअट लागू करणे व इतर मागण्यांसाठी अकोला जिल्ह्यातील सर्व कर्मचाऱ्यांनी आज काळ्या फिती लावून या आंदोलनामध्ये सहभागी होऊन हे आंदोलन यशस्वी केले. याकरिता जिल्हाध्यक्ष प्रदीप रावणकर, जिल्हा उपाध्यक्ष प्रवीण शर्मा, रमेश गिरी, जिल्हा सचिव दीपक सुरवाडे , स्थानिक अध्यक्ष ईश्वरदास पवार अकोट, भरत मलीये तेल्हारा, नागोराव सुरजुसे बाळापुर, शिरिष गांधी मुर्तीजापुर, नबी खान पातुर, रुपेश पिंजरकर बार्शिटाकळी यांचे नेतृत्वात जिल्ह्यातील नगर परिषद व नगर पंचायत कर्मचारी संवर्ग कर्मचारी सफाई कामगार या तीन टप्प्यात आंदोलनामध्ये सहभागी होऊन आंदोलन यशस्वी करणार असल्याचे रावणकार यांनी म्हटले आहे
जिल्ह्यातील नगर परिषद व नगरपंचायत कर्मचाऱ्यांनी केली काळ्या फिती लावून आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 02, 2021 4:18 AM