शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
2
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
3
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
4
Vinod Tawde: तावडे आलेल्या त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप
5
Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभेवेळी धक्का देणारा मराठवाडा भाजपाला देणार साथ? हे मुद्दे ठरू शकतात 'मास्टर स्ट्रोक'
6
...म्हणून देशाची राजधानी दिल्लीतून दुसरीकडे हलवा, शशी थरूर यांनी दिला सल्ला
7
Vinod Tawde: विनोद तावडे ठाकुरांच्याच कारमधून एकत्र का गेले? हितेंद्र ठाकुरांनी सगळे सांगितले...
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "विरोधकांसाठी 'ही रात्र शेवटची, ही ...", महाराष्ट्रात 'कॅश फॉर व्होट'वर भाजपची प्रतिक्रिया
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :"मला गोळ्या झाडा, मी मरणार नाही, तुम्हाला सोडणारही नाही"; हल्ल्यानंतर अनिल देशमुखांची पहिली प्रतिक्रिया
10
अजबच! सहा हजारांच्या लाच प्रकरणी सरकारी कर्मचाऱ्याला निवृत्तीनंतर ५ वर्षांनी शिक्षा
11
भारताचा पाकिस्तानला चॅम्पियन्स ट्रॉफीआधी मोठा धक्का; अंध T20 वर्ल्ड कपकडेही फिरवली पाठ
12
Vinod Tawde: ज्या पैशांवरून राडा केला, ते माझे नाहीतच; ज्या खोलीत पैसे सापडले तिथे मी गेलोच नव्हतो : विनोद तावडे
13
"राहुलजी, याला पोरकटपणा म्हणायचं नाही तर काय..."; विनोद तावडे यांचे राहुल गांधींना चोख प्रत्युत्तर
14
हिटमॅनचा परफेक्ट फॅमिली मॅन सीन! बाबांचा बर्थडे सेलिब्रेट करताना दिसला रोहित शर्मा (VIDEO)
15
“विनोद तावडेंवर कारवाई करत निष्पक्ष असल्याचे निवडणूक आयोग दाखवणार का?”; काँग्रेसचा सवाल
16
Indian Sports Honours 2024 : मनू, नीरज, स्मृतीसह यशस्वीचा सन्मान; पुरस्कार विजेत्यांची संपूर्ण यादी
17
राज्यातील 'हे' ३१ उमेदवार स्वतःला मत देऊ शकणार नाहीत! नक्की काय आहे प्रकरण?... वाचा
18
Baba Siddique : बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात मोठा खुलासा; आरोपीने सांगितलं नाव, कोण होता मास्टरमाइंड?
19
“५ कोटी कोणाच्या सेफमधून बाहेर आले?”; विनोद तावडे प्रकरणी राहुल गांधींचा PM मोदींना सवाल
20
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?

नागपूरच्या ‘समीक्षा समिती’ने केले अकोला जीएमसी’चे सर्वेक्षण!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 02, 2020 10:31 AM

समितीने रुग्णालयातील स्वच्छता तसेच कोरोनाबाधित रुग्णांना दिल्या जाणाऱ्या सुविधांची पाहणी केली.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : नागपूर येथील समीक्षा समितीने सोमवारी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा सर्वोपचार रुग्णालयाला भेट दिली. यावेळी समितीने रुग्णालयातील स्वच्छता तसेच कोरोनाबाधित रुग्णांना दिल्या जाणाऱ्या सुविधांची पाहणी केली. विशेष म्हणजे यावेळी समितीने प्रमुख्याने मनुष्यबळाचा आढावाही घेतला.जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक झाला असताना संपूर्ण रुग्णसेवेचा भार एकट्या जीएमसीवर आला आहे. हा ताण कमी करण्यासाठी रुग्णालय प्रशासनाने शासनाकडे मनुष्यबळाची मागणी केली होती. नागपूर येथील समीक्षा समितीने सोमवारी अकोला जीएमसीला भेट देऊन रुग्णालयाचे सर्वेक्षण केले. यावेळी अधिष्ठाता डॉ. कुसुमाकर घोरपडे यांच्यासह नागपूर येथील समीक्षा समितीच्या सदस्यांची उपस्थिती होती. गत अनेक वर्षांपासून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय प्रशासन शासनाकडे मनुष्यबळाची मागणी करत आहे; मात्र आतापर्यंत शासनाने त्याकडे दुर्लक्ष केले होते. अशातच गत महिन्याभरात कोरोना आधी त्यांचा आकडा झपाट्याने वाढला आहे. वाढत्या रुग्णसंख्येचा संपूर्ण ताण सर्वोपचार रुग्णालयावर आला आहे. दरम्यान, मनुष्यबळाची कमी रुग्णालय प्रशासनासाठी डोकेदुखी ठरू लागली. त्यामुळे रुग्णालय प्रशासनाने पुन्हा एकदा शासनाकडे मनुष्यबळाची मागणी केल्याची माहिती आहे. या पृष्ठभूमीवर शासनाकडून नागपूर येथून एक समीक्षा समिती पाठविण्यात येणार असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली. ही समिती सर्वोपचार रुग्णालयाचा संपूर्ण आढावा घेणार असून, आवश्यक बदल आणि रुग्णांना चांगल्या सुविधा कशा पुरविण्यात येतील, यावर मंथन करणार आहे. शिवाय किती मनुष्यबळाची आवश्यकता आहे, यावरही प्रमुख्याने विचार केला जाणार असल्याची माहिती आहे. सर्वोपचार रुग्णालयाचा आढावा घेऊन ही समिती आपला अहवाल शासनाकडे पाठवणार आहे. त्यानंतर शासन काय निर्णय घेईल, याकडे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनाचे लक्ष लागून आहे.३० ते ३५ डॉक्टरांची मागणीवैद्यकीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर घोरपडे यांनी शासनाकडे ३० ते ३५ डॉक्टरांची मागणी केली होती. त्या अनुषंगाने नागपूर येथील समीक्षा समितीने आढावा घेतला.

‘सुपर स्पेशालिटी’ची ही केली पाहणीजिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. ही संख्या अशीच वाढत राहिल्यास सर्वोपचार रुग्णालयात खाटांची संख्या वाढवावी लागणार आहे. त्यानुषंगाने पर्यायी जागा म्हणून सुपर स्पेशलिटी हॉस्पिटलची पाहणी सोमवारी समीक्षा समितीद्वारे करण्यात आली.

सर्वेक्षणातील प्रमुख मुद्दे उपचार पद्धतीत आवश्यक असलेले बदल नवीन सुधारणा करता येथील का? रुग्णांना कशाप्रकारे चांगल्या सुविधा देता येतील?सद्यस्थितीत किती मनुष्यबळाची आवश्यकता आहे?

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola GMC / Sarvopchar Rugnalayअकोला जीएमसी / सर्वोपचार रुग्णालय