शहरं
Join us  
Trending Stories
1
त्या घटनेच्या प्रतीला 'लाल' कव्हर, राहुल गांधींना अर्बन नक्षल्यांनी घेरलंय; फडणवीसांचा थेट हल्ला
2
केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांच्या प्रचार सभांचा धडाका; 'या' दिवशी पहिली सभा कोल्हापुरात
3
“लोकांची भावना तुतारीकडे…”; भाजपच्या सुरेश धस यांचं वक्तव्य: अजित पवारांवर साधला निशाणा!
4
दोन्ही उपमुख्यमंत्री निवडणूक रिंगणात; विठ्ठलाच्या महापूजेचा मान कोणाला मिळू शकतो? जाणून घ्या
5
फक्त २ 'परदेशी'; पंत, KL राहुल अन् श्रेयससह लिलावात सर्वाधिक मूळ किंमतीसह नाव नोंदणी करणारे खेळाडू
6
'स्विंग स्टेट्स' ठरवणार अमेरिकेचा नवा राष्ट्राध्यक्ष! ट्रम्प २० राज्यांत; कमला १० राज्यांत विजयी
7
'या' शेअरचं ट्रेडिंग बंद; कंपनीवर आहे प्रचंड कर्ज; ₹३४८ वरून ₹३४ वर आली किंमत
8
गोकुळचे माजी अध्यक्ष रवींद्र आपटे यांचे निधन; आज होणार अंत्यसंस्कार
9
अखेरची निवडणूक असल्याने माझा सन्मान राखावा; शहाजीबापू पाटलांचं जनतेला भावनिक आवाहन 
10
अल्लू अर्जुन आणि फहाद फासिल भिडणार! नवीन पोस्टर पाहून अंगावर येईल काटा
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates: मुंबईत आज इंडिया आघाडीची पहिली सभा; राहुल गांधी संबोधित करणार
12
भाजपकडून बंडखोरांवर मोठी कारवाई, राज्यातील ४० नेत्यांची पक्षातून हकालपट्टी
13
आजचे राशीभविष्य, ६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कन्येसाठी काळजीचा दिवस
14
कोण होणार अमेरिकेचा अध्यक्ष ट्रम्प की हॅरिस? 40 वर्षांत ज्यांची भविष्यवाणी कधी खोटी ठरली नाही त्यांनी सांगितलं
15
US Election Share Market : ट्रम्प यांच्या पुन्हा सत्तेत येण्याचे संकेत, भारतीय शेअर बाजारात तेजी; निफ्टी २४,३०० च्या वर
16
इस्रायलचा गाझामध्ये पुन्हा मोठा हल्ला! एअरस्ट्राइकमध्ये महिला-मुलांसह ३० जणांचा मृत्यू
17
सरकार 'या' कंपनीतील २.५ टक्के हिस्सा विकणार; ५०५ रुपये प्रति शेअर किंमत झाली निश्चित, जाणून घ्या
18
नेमक्या कोणत्या कारणांमुळे रश्मी शुक्लांची झाली उचलबांगडी? समोर आली अशी माहिती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'चं पहिलं पोस्टर समोर! सिनेमाचा सीक्वलही येणार, कधी प्रदर्शित होणार चित्रपट?
20
सत्तेत आल्यास मुलांनाही मोफत शिक्षण, उद्धव ठाकरे यांचे आश्वासन, कोल्हापुरातून प्रचाराचा फोडला नारळ

शिस्तीच्या नावाखाली प्रशिक्षणार्थी पोलीस वेठीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2019 1:15 PM

अकोला: अकोल्यातील पोलीस प्रशिक्षण केंद्राला ऐतिहासिक परंपरा लाभली असून, तब्बल ५० वर्षांपेक्षा अधिक कालावधीपासून सुरू असलेल्या या पोलीस प्रशिक्षण केंद्रातील प्रशिक्षणार्थी पोलिसांना गत काही महिन्यांपासून शिस्तीच्या नावाने वेठीस धरण्यात येत असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.

- सचिन राऊतअकोला: अकोल्यातील पोलीस प्रशिक्षण केंद्राला ऐतिहासिक परंपरा लाभली असून, तब्बल ५० वर्षांपेक्षा अधिक कालावधीपासून सुरू असलेल्या या पोलीस प्रशिक्षण केंद्रातील प्रशिक्षणार्थी पोलिसांना गत काही महिन्यांपासून शिस्तीच्या नावाने वेठीस धरण्यात येत असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. या ठिकाणी मक्तेदारी असलेल्या काही अधिकाऱ्यांनी प्रशिक्षणार्थी पोलिसांना त्रस्त करण्यासाठी पिण्यासाठी गरम पाणी दिल्याचे वास्तव असून, कायद्याचा विषय शिकविणाºया एका अधिकाºयाने तर एप्रिल महिन्यातील कडक उन्हात गत आठवड्यात शिकवणी खोलीतील पंखे बंद करून खिडक्याही बंद केल्याचा धक्कादायक प्रकार घडला होता.अकोला पोलीस प्रशिक्षण के ंद्रात ५९७ प्रशिक्षणार्थी पोलीस असून, त्यांचा कालावधी ६ जूनपर्यंत आहे. या प्रशिक्षणार्थी पोलिसांना पिण्याच्या पाण्यापासून ते इतर मूलभूत सुविधांसाठी लढा द्यावा लागत असल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे. प्रशिक्षणार्थी पोलिसांना पिण्याच्या पाण्याची सोय नसल्याने त्यांनी बाहेरून पाण्याची कॅन लावण्याची विनंती केली असता नकार देण्यात आला आहे. गत आठवड्यात काही प्रशिक्षणार्थींनी सामूहिक तक्रार करीत पाण्यासाठी आग्रह धरला असता एका अधिकाºयाने त्यांची चांगलीच खरडपट्टी काढत अत्यंत खालच्या भाषेत या विद्यार्थ्यांना झापल्याची माहिती आहे. एवढेच नव्हे, तर कारण नसताना मैदानाला तब्बल १२ ते १५ वेळा धावत फेºया मारण्याची शिक्षा देण्यात येत आहे. ही शिक्षा देताना प्रशिक्षणार्थी पोलिसांना दोन्ही हात वर करून रायफल देण्यात येते तर कधी साहित्याची पेटी डोक्यावर ठेवून ही शिक्षा देण्यात येत असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. पोलीस प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य यांना अनभिज्ञ ठेवून त्यांच्याच अखत्यारीत काही अधिकारी तसेच ८ ते १० वर्षांपासून या ठिकाणी शिकविणाºया अधिकाऱ्यांनी हा प्रताप सुरू केल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. काही महिन्यांपूर्वी एका विद्यार्थ्याचे पालक आजारी असल्याने त्यांनी रजेचा अर्ज केला होता; मात्र त्यावर बरेच दिवस दखल घेतल्या गेली नाही. काही दिवसांतच आजारपणामुळे त्याच विद्यार्थ्याचे पालक मरण पावले; मात्र त्यानंतरही रजेकरिता पायपीट करावी लागल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. मैदानावर एका अधिकाºयाने विद्यार्थ्यांना शिवीगाळ व मारहाण करण्याचा प्रताप केला होता. त्यामुळे तक्रार केल्याने त्या अधिकाºयाची चौकशी सुरू असल्याची माहिती आहे. प्राचार्यांना अंधारात ठेवून काहींनी हा प्रताप सुरू केला असून, याकडे प्राचार्यांनी लक्ष देण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे.अधिकाºयांची हुकूमशाहीपोलीस प्रशिक्षण केंद्रातील प्राचार्यांचे थोडेसे दुर्लक्ष होताच येथील तीन ते चार अधिकारी हुकूमशाही पद्धतीने वागणूक देत असल्याची माहिती आहे. यामध्ये दोघे जण तब्बल ८ ते १० वर्षांपासून याच ठिकाणी कार्यरत असून, त्यांची दहशत असल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे. त्यामुळे वरिष्ठ अधिकाºयांनी पोलीस प्रशिक्षण केंद्रातील या गंभीर समस्यांकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे. कॅ न्टीनमध्ये जाणारा रस्ता खोदलापोलीस प्रशिक्षण केंद्रानजीक असलेल्या कॅ न्टीनमध्ये विद्यार्थी नास्ता करण्यासाठी तसेच लस्सी पिण्यासाठी जात होते; मात्र हा रस्ताही खोदून ठेवण्यात आला असून, त्यांना यापासूनही वंचित ठेवण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. प्रशिक्षणार्थी पोलीस स्वखर्चाने बाहेरून पाणी आणण्यासह त्यांचा नास्ता व इतर खाद्यपदार्थ घेण्यासाठी आटापिटा करीत आहेत; मात्र त्यांचे हे रस्ते बंद करण्यात येत आहेत. पाचपेक्षा अधिक फेºयांची शिक्षापोलीस प्रशिक्षण केंद्रातील प्रशिक्षणार्थी पोलिसांना पाचपेक्षा अधिक वेळा मैदानाला चक्कर मारण्याची शिक्षा देऊ नये, असा नियम आहे; मात्र येथील प्रशिक्षणार्थींना तब्बल १२ ते १५ फेºयांची शिक्षा देण्यात येत आहे. त्यामुळे नियमांचा भंग करून शिक्षा देण्यात येत असल्याचे वास्तव आहे. सर्व अधिकाºयांना बाजूला ठेवून प्राचार्यांनी प्रशिक्षणार्थींचा दरबार घेत असल्यास या गंभीर प्रकाराचे वास्तव समोर येणार, यात शंका नाही. पोलीस प्रशिक्षण केंद्रात शिस्तीला प्रथम प्राधान्य देण्यात येते. प्रशिक्षणार्थी पोलिसांना समाजात आदर्श निर्माण करावा लागतो. त्यामुळे त्यांची वागणूक शिस्तीत ठेवण्यासाठी सर्व प्रयत्न करण्यात येतात. त्यांना काही तक्रार असल्यास त्यांच्या सुविधेसाठी प्रत्येक ठिकाणी तक्रारपेटी आहे. निनावी तक्रार केल्यास त्यावर चौकशी समितीद्वारे निर्णय घेण्यात येतो. मी स्वत: २४ तास प्रशिक्षण केंद्रात उपलब्ध असतो, त्यामुळे विद्यार्थ्यांना शिस्त सोडून विनाकारण त्रास देण्यात येत असेल, तर त्यांनी थेट माझ्याशी संपर्क साधावा. प्रशिक्षणार्थी पोलिसांच्या कॅ न्टीनसह खोली, मेस या ठिकाणी अचानक भेटी देण्यात येतात. त्यामुळे सत्य परिस्थिती समोर येते; मात्र त्यानंतरही काही त्रुटी असल्यास त्या तातडीने दूर करण्यात येतात. ज्या प्रशिक्षणार्थींना त्रास झाल्याच्या तक्रारी झाल्या, त्यांचा हेतू चुकीचा असल्याचे दिसून येते.- प्रशांत वांघुर्डे, प्राचार्य,पोलीस प्रशिक्षण केंद्र, अकोला.

 

टॅग्स :AkolaअकोलाPoliceपोलिस