संतोष येलकर......................
अकोला : मतदार यादीत छायाचित्र नसलेल्या जिल्ह्यातील ६० हजार ८४९ मतदारांची नावे मतदार यादीतून वगळण्याची कार्यवाही जिल्हा प्रशासनामार्फत २८ ऑगस्टपर्यंत करण्यात आली असून, याबाबतचा अहवाल निवडणूक आयोगाकडे पाठविण्यात आला आहे.
भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदार यादीमध्ये छायाचित्र नसलेले तसेच स्थलांतरित झालेल्या मतदारांची नावे मतदार यादीतून वगळण्याची मोहीम जिल्ह्यातील पाचही विधानसभा मतदारसंघांत उपविभागीय अधिकारी तथा मतदार नोंदणी अधिकाऱ्यांमार्फत राबविण्यात आली. त्यामध्ये जिल्ह्यातील अकोट, बाळापूर, अकोला पश्चिम, अकोला पूर्व व मूर्तिजापूर या पाचही विधानसभा मतदारसंघांमध्ये मतदार यादीत छायाचित्र नसलेल्या आणि स्थलांतरित ६० हजार ८४९ मतदारांची नावे मतदार यादीतून वगळण्याची कार्यवाही गत २६ ऑगस्टपर्यंत करण्यात आली. मतदार यादीत छायाचित्र नसलेल्या आणि स्थलांतरित संबंधित मतदारांची नावे मतदार यादीतून वगळण्यात आल्याचा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाच्या निवडणूक विभागामार्फत निवडणूक आयोगाकडे पाठविण्यात आला आहे.
विधानसभा मतदारसंघनिहाय मतदार
यादीतून नावे वगळलेल्या मतदारांची संख्या !
मतदारसंघ मतदार
अकोट ५७८९
बाळापूर ४१७४
अकोला पश्चिम २२४४२
अकोला पूर्व १५७९४
मूर्तिजापूर १२६५०
..............................................................
एकूण ६०८४९
..............................................................
राजकीय पक्षांना दिली जाणार यादी !
मतदार यादीत छायाचित्र नसलेल्या आणि स्थलांतरित मतदारांची नावे मतदार यादीतून वगळण्यात आली आहेत. मतदार यादीतून नावे वगळण्यात आलेल्या मतदारांची यादी संबंधित मतदार नोंदणी अधिकारी कार्यालयांमार्फत लवकरच राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडे उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
..............................
नव्याने नाव समाविष्ट करण्यासाठी
‘बीएलओं’ करावा लागणार अर्ज !
मतदार यादीतून वगळण्यात आलेल्या मतदारांच्या नावांमध्ये पात्र मतदारांचे नाव वगळले गेले असल्यास संबंधित मतदारास मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी नव्याने नमुना ६ चा अर्ज संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांकडे (बीएलओ) सादर करावा लागणार आहे.
.......................................
भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदार यादीमध्ये छायाचित्र नसलेल्या आणि स्थलांतरित झालेल्या मतदारांची नावे मतदार यादीतून वगळण्याची कार्यवाही करण्यात आली आहे. मतदार यादीतून नावे वगळण्यात आलेल्या मतदारांची यादी प्रसिद्ध करण्यात आली असून, ही यादी राजकीय पक्षांनाही लवकरच उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
डाॅ. नीलेश अपार,
मतदार नोंदणी अधिकारी तथा
उपविभागीय अधिकारी, अकोला