शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
3
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
4
हुश्श... उमेदवारांच्या कॉल, जाहिरातींनी मतदारांना भंडावून सोडलेले; अखेर प्रचार संपला, आता...
5
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार
6
ओवेसींचा मोठा दावा...! म्हणाले, "भारतात बसून ट्रम्प यांना जिंकून दिलं..."; CM योगींनाही खुलं आव्हान
7
'उद्धव ठाकरे सत्तेसाठी काँग्रेसच्या मांडीवर बसले', शेवटच्या प्रचारसभेत जेपी नड्डांचे टीकास्त्र
8
IPL मेगा लिलावासाठी परफेक्ट ऑडिशन; Marcus Stoinis नं पाक गोलंदाजांना धु धु धुतलं!
9
Explainer : पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांच्या सभा गाजल्या; मात्र गर्दीचं रुपांतर मतांमध्ये होणार का?
10
“जनताच महायुतीला सत्तेतून खाली खेचेल, लोकसभेनंतर विधानसभेला मविआला विजयी करा”: खरगे
11
Video: वा रे पठ्ठ्या! वेदना सहन होत नसूनही मैदानात उतरला, एका हाताने केली फलंदाजी
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'जिकडं म्हातारं फिरतंय, तिकडं चांगभलं हुतंय'; बारामतीत प्रतिभा पवारांच्या हातातील बॅनरची चर्चा
13
Babar Azam नं किंग कोहलीचा विक्रम मोडला; रोहितचा 'महा रेकॉर्ड'ही त्याच्या टप्प्यात
14
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
15
“२३ तारखेनंतर कोणावर दया नाही, फडणवीस-शिंदेंना पोलिसांत हेलपाटे मारावे लागतील”: संजय राऊत
16
शरद पवारांना मी आमदार केलं असं म्हणणार नाही, कारण त्यावेळी मी तिसरीत होतो: अजित पवार
17
महाराष्ट्रात मविआ सरकार आल्यास आरक्षणात मुस्लीम कोटा देण्यावर चर्चा; रेवंथ रेड्डींची गॅरंटी
18
'पथेर पांचाली'मधील 'दुर्गा' काळाच्या पडद्याआड, ज्येष्ठ अभिनेत्री उमा दासगुप्ता यांचं निधन
19
मुख्यमंत्री नितीश कुमार एकुलता एक मुलगा निशांतला लाँच करण्याच्या तयारीत? चर्चांना उधाण
20
शर्वरी जोग नव्या मालिकेत झळकणार, अभिनेत्रीच्या खऱ्या आयुष्यातील 'मितवा' कोण माहितीये का?

उघडयावर शौचास जाणा-यांची नावे रेडिओवरुन जाहीर

By admin | Published: January 10, 2017 4:49 PM

उघडयावर शौचास जाणा-यांचे उघडयावर जाणे थांबावे यासाठी विविध प्रयत्न करुनही काही बहाद्दर अजुनही उघडयावर जात असल्याने वाशिम नगरपरिषदेचे मुख्याधिकारी गणेश

- नंदकिशोर नारे / वाशिम
 
उघडयावर शौचास जाणा-यांचे उघडयावर जाणे थांबावे यासाठी विविध प्रयत्न करुनही काही बहाद्दर अजुनही उघडयावर जात असल्याने वाशिम नगरपरिषदेचे मुख्याधिकारी गणेश शेटे यांनी नविन संकल्पना तयार केली. आता उघडयावर शौचास जाणा-यांची नावे ‘रेडिाओ वत्सगुल्म’ वरुन जाहीर करण्यात येत आहेत. 
जिल्हयात स्वच्छ शहर ठेवण्यासाठी चारही नगरपरिषदेच्यावतीने स्वच्छता अभियान राबविण्यात येत आहे. यामध्ये सर्वाधिक पुढे वाशिम नगरपरिषद असून वेगवेगळया क्लुप्त्या लढवून उघडयावर शौचास जाणा-यांना रोख देण्यासाठी प्रयत्न केल्या जात आहे. वाशिम नगरपरिषदेच्या पाणी पुरवठा व स्वच्छता अभियान विभागाच्यावतीने नगरपरिषदेमध्ये कर्तव्यावर असलेल्या ८० टक्के कर्मचारी या कामाला भिडले आहेत. नगरपरिषदेच्यावतीने नुकतेच उघडयावर शौचास जाणा-यांची छायाचित्रे शहरातील मुख्य चौका-चौकात झळकवली. यामुळे चांगलाच परिणाम झाल्याने अनेकांनी शौचालय बांधकामांना गती दिली आहे, असे असतांनाही गुडमॉर्निंग पथक पाहणी दरम्यान नेहमी नेहमी तेच ते लोक उघडयावर शौचास जातांना दिसून येत आहे. वाशिम नगरपरिषदेचे मुख्याधिकारी गणेश शेटे यांनी आता अशा शौच बहाद्दरांची नावे रेडिओ वल्सगुल्मवरुन जाहीर करण्याचा निर्णय घेतला आहे. गत दोन दिवसांपासून रेडिओ वत्सगुल्मवर विविध प्रकारच्या टिका टिपण्या करुन उघडयावर शौचास जाणाºयांची नावे जाहीर केल्य जात आहेत. या उपक्रमाचे शहरात सर्वत्र कौतूक होत असून चांगलीच चर्चा रंगत आहेत.
 
‘काय राव पदमतिर्थाच्या बाजुला राहता अन उघडयावर जाता’ची जोरदार चर्चा!
उघडयावर शौचास जाणाºयांची नावे आगळयाा-वेगळया पध्दतीने घेतल्या जात असल्याने शहरात ‘काय राव....उघडयावर जाता’ असे म्हणून चर्चा रंगत आहेत. ज्या भागातील नागरिक उघडयावर शौचास जात आहेत त्या भागाचे नाव, त्यांच्या वडिलांचे नाव घेवून त्यावर टिका टिपणीमुळे  शहरात हा विषय चांगलाच चर्चेचा झाला आहे.
 
उघडयावर शौचास जाण्यामुळे होणारे आजार पाहता मोठया प्रमाणात जनजागृती करण्यात आली. कडक मोहीमही हाती घेण्यात आली, गांधीगिरी सुध्दा केली तरी काही जण अद्याप उघडयावर शौचास जात असल्याने असा कठोर निर्णय घेण्याची वेळ आली आहे. प्रत्येक मनुष्याने आपली मानसिकता बदलून उघडयावर शौचास जाण्याचे दुष्परिणाम जाणून खबरदारी घेणे आवश्यक आहे. शहरवासियांन सहकार्य केल्यास हे शक्य सुध्दा आहे. येत्या मार्चपर्यंत शहर हागणदारीमुक्त करायचे आहे. यासाठी प्रयत्न केल्या जात आहेत.
- गणेश शेटे
मुख्याधिकारी, नगरपरिषद वाशिम