अकोला : मालमत्ता खरेदीच्या दस्त नोंदणीतील मुद्रांक शुल्काची रक्कम थकीत असलेल्या जिल्ह्यातील १६ थकबाकीदारांची नावे जिल्हा सहनिबंधक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी डी. एस. भोसले यांनी १५ जानेवारी रोजी जाहीर केली असून, थकबाकीदारांकडून थकीत मुद्रांक शुल्काची रक्कम वसूल करण्यात येणार आहे.
मालमत्ता खरेदीच्या दस्त नोंदणीमध्ये मालमत्तेचे मूल्यांकन कमी दाखवून मुद्रांक शुल्कापोटी कमी रक्कमेचा भरणा करणाऱ्यांकडून थकीत मुद्रांक शुल्काची रक्कम वसूल करण्याची कार्यवाही सहजिल्हा निबंधक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी कार्यालयाकडून सुरू करण्यात आली आहे. त्यामध्ये जिल्ह्यात मुद्रांक शुल्क थकीत असलेल्या जिल्ह्यातील १६ थकबाकीदारांना थकीत रक्कमेचा भरणा करण्यासंदर्भात नोटीस बजावण्यात आल्या आहेत. तसेच मुद्रांक शुल्क थकीत असलेल्या जिल्ह्यातील १६ थकबाकीदारांची नावे जिल्हा सहनिबंधक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी डी.एस.भोसले यांनी जाहीर केली असून, संबंधित थकबाकीदारांकडून मुद्रांक शुल्काची थकीत रक्कम वसूल करण्यात येणार आहे.