पातूर शहराची ओळख असलेल्या श्री नानासाहेब यांचे प्राचीन मंदिर आहे. दरवर्षी रथसप्तमीच्या तिसऱ्या दिवशी मंदिराच्या परिसरात महाप्रसाद, तसेच यात्रेचे आयोजन करण्यात येते. या यात्रेत पंचक्रोशीतील भाविक मोठ्या संख्येने सहभागी होऊन दर्शन व महाप्रसादाचा लाभ घेतात. सध्या जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे कोरोनाची साखळी तोडण्यासाठी सार्वजनिक, धार्मिक कार्यक्रम आयोजित करताना शासनाने दिलेल्या निर्देशांचे पालन करीत, या वर्षीचा सोमवारी होणारा नानासाहेब यात्रा महोत्सव रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे भाविकांनी गर्दी न करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांनी मास्क/सॅनिटायजरचा उपयोग करावा, फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करावे, असे आवाहन श्री. नानासाहेब चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे. (फोटो)
पातूर येथील नानासाहेब यात्रा रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 4:28 AM