लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : नारायण राणे काँग्रेसमध्ये आले; मात्र त्यांना काँग्रेसची संस्कृती अजूनही समजली नाही. पदांमुळे ते दुखावले असल्याने अशोकराव चव्हाण आणि माझ्यावर टीका करीत आहेत. मी महाराष्ट्रात येण्याआधीपासून आहे ते जाणार, असे आम्हीही ऐकत आहोत; अशी प्रतिक्रिया महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली. अकोल्यातील ज्येष्ठ नेते सुधाकरराव गणगणे यांच्या निवासस्थानी रविवारी त्यांनी पत्रकारांशी हा संवाद साधला. पुसद येथील पुस्तक प्रकाशनानिमित्त जाण्यासाठी चव्हाण विदर्भ एक्स्प्रेसने अकोल्यात होते.तूर उत्पादनाचे अंदाज वारंवार बदलून राज्य सरकारने सट्टाबाजार गरम केला आहे. भाजपचे सटोडियांशी संगनमत असल्याचा आरोप करीत पृथ्वीराज चव्हाण यांनी तुरीच्या आकडेवारीचा गोंधळ पत्रकारांसमोर मांडला. काँग्रेसने आरोप केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी लोकायुक्तांकडून चौकशी लावली. तीदेखील अधिकार नसल्याने फसवी ठरत आहे. पीक उत्पादनाचे अंदाज राज्य शासन केंद्राला देत असते. तूर पिकाच्या अंदाजात राज्याने कोटीच केली. आधी ४ लाख ४४ हजार टन दाखविले, त्यानंतर १२ लाख ५८ टन दाखविले, नंतर चौथा अंदाज २0 लाख ३५ हजार टन दाखविले. राज्यात पाचपट तुरीचे उत्पादन होत असताना राज्यकर्त्यांना अंदाज काढता येत नाही. तुरीचे पाचपट उत्पादन वाढले असताना नाफेडतर्फे खरेदीची व्यवस्था होत नाही. आयात-निर्यातचे धोरण निश्चित नाही. सहा लाख टन तूर शासनाने खरेदी केली. हमीभावापेक्षा कमी दरातील पाच लाख टन तूर व्यापार्यांनी खरेदी केली. उर्वरित नऊ लाख टन तुरीचे काय झाले, याचा हिशेब राज्याला अजूनही देता आलेला नाही. विदर्भ-मराठवाड्यातील तुरीसारखीच परिस्थिती आता साखर उसाची झाली आहे.
नारायण राणेंना काँग्रेसची संस्कृती समजलीच नाही - पृथ्वीराज चव्हाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2017 8:18 PM
अकोला : नारायण राणे काँग्रेसमध्ये आले; मात्र त्यांना काँग्रेसची संस्कृती अजूनही समजली नाही. पदांमुळे ते दुखावले असल्याने अशोकराव चव्हाण आणि माझ्यावर टीका करीत आहेत. मी महाराष्ट्रात येण्याआधीपासून आहे ते जाणार, असे आम्हीही ऐकत आहोत; अशी प्रतिक्रिया महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली. अकोल्यातील ज्येष्ठ नेते सुधाकरराव गणगणे यांच्या निवासस्थानी रविवारी त्यांनी पत्रकारांशी हा संवाद साधला. पुसद येथील पुस्तक प्रकाशनानिमित्त जाण्यासाठी चव्हाण विदर्भ एक्स्प्रेसने अकोल्यात होते.
ठळक मुद्देतूर खरेदीत भाजपचे सटोडियांशी संगनमतरविवारी पत्रकारांशी साधला संवाद