बुलडाणा : जिल्ह्यात साहित्य क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटवणारे ज्येष्ठ साहित्यिक नरेंद्र लांजेवार यांचे १३ फेब्रुवारी राेजी सकाळी १० वाजता निधन झाले़ बुलडाणा शहरातील भारत विद्यालयाचे ग्रंथपाल म्हणून कार्यरत असलेले लांजेवार यांची ज्येष्ठ साहित्यिक, विचारवंत, निवेदक म्हणून ओळख हाेती़त्यांनी अभिव्यक्तीचे क्षितिजे, वाचू आनंदे मिळवू पपरमानंदे, बुलडाणा जिल्हा साहित्य दर्शन, शेतकऱ्यांच्या आत्महत्या: चिंता आणि चिंतन,, कथांकुर अशी अनेक पुस्तकांचे लेखन केले आहे़ याशिवाय २०० प्रासंगिक तथा वाङ्मयीन लेख लिहिले आहेत. विविध दैनिके तसेच साप्ताहिकांमध्ये तसेच दिवाळी अंकात त्यांचे लेख प्रकाशित झालेले आहेत. नरेंद्र लांजेवार यांनी आकाशवाणी च्या जळगाव केंद्रावरून विविध कार्यक्रमांचे प्रसारण तथा ‘उगवतीचे रंग’, ‘बालवाडी’, ‘पुस्तक परिचय’, ‘पालक-बालक’, ‘साल आणि उकल’, ‘पाऊलखुणा’ इ,सदरांचे लेखन केले आहे. लहान मुलांना वाचनाची गाेडी लागावी म्हणून त्यांनी बुलडाणा शहरात ५० पुस्तकमैत्री बाल वाचनालयाे उभारले आहेत़ बुलडाणा शहरातील प्रगती वाचनालयाच्या विकासात त्यांचा माेठा वाटा आहे़ सध्या ते वाचनालयाचे सचिव म्हणून कार्यरत हाेते़
ज्येष्ठ साहित्यीक नरेंद्र लांजेवार यांचे निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2022 11:56 AM