अकोला: पश्चिम महाराष्ट्रामध्ये कांद्याचे भाव पडल्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांवर संकट कोसळले आहे. पिकवलेल्या मोत्यांना घामाचे दाम मिळत नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. व्यापाºयाकडून कांद्याला भाव मिळत नसल्याने कांदा उत्पादक शेतकरीच आता बाजारात उतरला आहे. लासलगावचा कांदा घेऊन नाशिकचा शेतकºयावर अकोल्यात येऊन कांद्याची विक्री करावी लागत आहे.कांद्याला पन्नास, एक रुपये किलोने दर मिळत असल्यामुळे शेतकºयाचा कांदा विक्रीचा खर्चही निघत नाही. त्यामुळे शेतकरी फुकटात कांदा देण्यासोबतच रस्त्यावर कांदा फेकून शासनाच्या शेतकरीविरोधी धोरणाचा निषेध नोंदवित आहेत. शेतमालाला भाव नाही. व्यापारी वाट्टेल त्या किमतीमध्ये कष्टाने पिकवलेला शेतमाल मागतो. शेतकºयाला नफा तर सोडाच, त्याने पिकवलेल्या शेतमाल लागवडीचा खर्चही निघत नसल्याने, शेतकरी हवालदिल झाला आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये, व्यापाºयाला माल विकण्यापेक्षा त्याने आता स्वत:च मालाची विक्री करण्याचा निर्णय घेतला आहे. नाशिक जिल्ह्यातील काही शेतकरी ट्रकने कांदा घेऊन अकोल्यात दाखल झाले आहेत. एक ते दोन रुपये किलो दराने कांदा विकण्यापेक्षा अकोल्यात ५0 ते ७0 रुपयांमध्ये दहा किलो कांद्यांची गोणी तयार करून हे शेतकरी विकत आहेत. बाजारामध्ये १५ रुपये किलो दराने कांदा मिळत असल्याने, नागरिकांनाही पाच ते सहा रुपये किलो दराने कांदा स्वस्त मिळत आहे. त्यामुळे या शेतकºयांना अकोल्यातील नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. बाजारपेठेतील भावापेक्षा स्वविक्रीतून शेतकºयांच्या कांद्याला चांगला दर मिळत नसल्यामुळे अकोल्यात दररोज दोन ते तीन ट्रक कांदा नाशिकवरून येत आहे. जिल्हा कारागृहासमोर ट्रक उभा करून हे शेतकरी कांद्याची विक्री करीत आहेत. या विक्रीतून शेतकºयांच्या कांद्याला ७00 ते ८00 रुपये प्रति क्विंटल असा दर मिळत आहे. (प्रतिनिधी)