शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
8
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
9
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
10
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
11
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
12
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
13
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
14
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
15
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
16
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
17
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
18
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
19
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
20
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'

नॅशनल अचिव्हमेंट सर्वेक्षण :  सिंधुदुर्ग, रत्नागिरी, सातारा, नगरची पोरं हुश्शार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 03, 2018 1:27 PM

अचिव्हमेंट सर्वेक्षणामध्ये सिंधुदुर्ग, रत्नागिरी, सातारा, अहमदनगरची पोरं हुश्शार ठरली आहेत. तर विदर्भातील नागपूर, अमरावती, अकोला, यवतमाळच्या विद्यार्थ्यांची गुणवत्ता असमाधानकारक असल्याचे दिसून आले.

ठळक मुद्देसंपूर्ण देशामध्ये इयत्ता तिसरी, पाचवी आणि आठवीतील विद्यार्थ्यांची भाषा, गणित, विज्ञान, सामाजिक शास्त्र विषयातील गुणवत्ता तपासण्याच्या दृष्टिकोनातून नोव्हेंबर २0१७ मध्ये राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण (एनएएस) घेण्यात आले होते. या सर्वेक्षणाचा जिल्हानिहाय निकाल जाहीर करण्यात आला असून, यात सिंधुदुर्ग, रत्नागिरी, सातारा, अहमदनगरची पोरं हुश्शार ठरली आहेत. तर विदर्भातील नागपूर, अमरावती, अकोला, यवतमाळच्या विद्यार्थ्यांची गुणवत्ता असमाधानकारक असल्याचे दिसून आले.

- नितीन गव्हाळे

अकोला : केंद्र शासनाच्यावतीने संपूर्ण देशामध्ये इयत्ता तिसरी, पाचवी आणि आठवीतील विद्यार्थ्यांची भाषा, गणित, विज्ञान, सामाजिक शास्त्र विषयातील गुणवत्ता तपासण्याच्या दृष्टिकोनातून नोव्हेंबर २0१७ मध्ये राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण (एनएएस) घेण्यात आले होते. या सर्वेक्षणाचा जिल्हानिहाय निकाल जाहीर करण्यात आला असून, यात सिंधुदुर्ग, रत्नागिरी, सातारा, अहमदनगरची पोरं हुश्शार ठरली आहेत. या जिल्ह्यातील अनुक्रमे अचिव्हमेंट सर्वेक्षणामध्ये प्रथम, द्वितीय, तृतीय व चतुर्थ स्थान पटकावून आपली गुणवत्ता दाखवून दिली, तर विदर्भातील नागपूर, अमरावती, अकोला, यवतमाळच्या विद्यार्थ्यांची गुणवत्ता असमाधानकारक असल्याचे दिसून आले.राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील शाळांमध्ये इयत्ता तिसरी, पाचवी आणि आठवीत शिकणाºया विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता आणि त्यांचे विषयांमधील ज्ञान तपासण्यासाठी विद्या प्राधिकरण पुणेमार्फत राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण केले होते. जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्थेच्या माध्यमातून हे सर्वेक्षण करण्यात आले. इयत्ता तिसरी, पाचवीच्या आणि आठवीच्या ५१ शाळांमध्ये हे सर्वेक्षण करण्यात आले. सर्वेक्षणादरम्यान इयत्ता तिसरीत शिकणाºया विद्यार्थ्यांची परिसर अभ्यास (ईव्हीएस), मराठी भाषा, गणित विषयाची चाचणी घेण्यात आली. तसेच इयत्ता पाचवीतील विद्यार्थ्यांची परिसर अभ्यास, मराठी भाषा, गणित विषयाची, तर इयत्ता आठवीतील विद्यार्थ्यांची विज्ञान, मराठी भाषा, गणित आणि सामाजिक शास्त्र विषयातील चाचणी घेण्यात आली. या सर्वेक्षणात सिंधुदुर्ग जिल्ह्याने तिसºया वर्गामध्ये उत्कृष्ट निकाल देत राज्यात प्रथम स्थान पटकावले. त्याखालोखाल रत्नागिरीने दुसरे, सातारा जिल्ह्याने तिसरे अहमदनगरने चौथे, तर सोलापूर जिल्ह्याने पाचवे स्थान पटकावले. सहावे स्थान बीड, तर सातवे स्थान गडचिरोली जिल्ह्याने मिळविले. इयत्ता पाचवीच्या सर्वेक्षणात पहिले स्थान रत्नागिरी, दुसरे सिंधुदुर्ग, हिंगोलीने तिसरे, गडचिरोलीने चौथे, बीडने पाचवे, तर उस्मानाबाद जिल्ह्याने सहावे स्थान पटकावले. तसेच आठवीच्या सर्वेक्षणात पहिले स्थान बीड जिल्ह्याने पटकावले. दुसरे सिंधुदुर्ग, तिसरे नंदूरबारने, चौथे बुलडाणाने, पाचवे स्थान हिंगोलीने, तर सहावे स्थान गडचिरोली जिल्ह्याने पटकावले. या सर्वेक्षणात गडचिरोली जिल्हा वगळता विदर्भातील एकाही जिल्ह्याने पहिल्या दहामध्ये स्थान मिळविले नाही. यावरून विदर्भातील विद्यार्थ्यांची गुणवत्ता घसरत असल्याचे दिसून येते.

सर्वेक्षणातील पहिल्या पाचमधील जिल्ह्यांची टक्केवारीसिंधुदुर्ग जिल्ह्याने तिसºया वर्गातील सर्वेक्षणात एकूण ८२.१७ टक्के प्राप्त केले. रत्नागिरी जिल्ह्याने ८१.४५ टक्के, सातारा जिल्ह्याने ८0.३२, टक्के, तर नगर जिल्ह्याचा निकाल ७७.३९ टक्के, बीड जिल्ह्याचा ७६,७४, सोलापूर जिल्ह्याचा ७६.३४ आणि गडचिरोली जिल्ह्याचा ७१.१५ टक्के निकाल लागला.

पाचवीच्या सर्वेक्षणात रत्नागिरी अव्वलवर्ग पाचवीच्या सर्वेक्षणात रत्नागिरी जिल्ह्याने ६८.५१ टक्के, सिंधुदुर्ग जिल्ह्याने ६५.१३ टक्के, हिंगोली जिल्ह्याने ६३.६७, गडचिरोली जिल्ह्याने ६२.९१ टक्के मिळविले. बीड जिल्ह्याने ६0.६१ टक्के पटकावत पाचवे स्थान मिळविले.

आठवीच्या सर्वेक्षणात बीड प्रथमवर्ग आठवीचा निकाल कमी लागला असून, यात बीडने ५५.0४ टक्के मिळवित पहिले स्थान पटकावले. ४८.२४ टक्के मिळवून दुसरे स्थान सिंधुदुर्गने, तर नंदुरबार जिल्ह्याने ५0.६१ टक्के मिळवून तिसरे स्थान प्राप्त केले.  बुलडाण्याने ४५.३५ टक्के मिळवित चौथे, तर हिंगोलीने ४६ टक्के मिळवित पाचवे आणि गडचिरोली जिल्ह्याने ४६.६२ टक्के प्राप्त करीत सहाव्या स्थानी झेप घेतली. 

विदर्भातील जिल्ह्यांची टक्केवारीगडचिरोली, बुलडाणा, वाशिमची कामगिरी समाधानकारक

गडचिरोली- ७१.१५ टक्के (वर्ग तिसरा)                ६२.९१ टक्के (वर्ग पाचवा)                ४६.६२  टक्के (वर्ग आठवा)वाशिम- ७१.८४  टक्के (वर्ग तिसरा)           ५९.७४ टक्के (वर्ग पाचवा)           ३८.0१ टक्के (वर्ग आठवा)अकोला-६२.८३ टक्के (वर्ग तिसरा)            ५५.४९ टक्के (वर्ग पाचवा)            ३६.५३ टक्के (वर्ग आठवा)नागपूर- ६७.६९ टक्के (वर्ग तिसरा)          ५0.८३ टक्के (वर्ग पाचवा)            ३४.४८ टक्के (वर्ग आठवा)अमरावती- ६0.२६ टक्के (वर्ग तिसरा)              ५0.४९ टक्के (वर्ग पाचवा)              ३६.९८ टक्के (वर्ग आठवा)यवतमाळ- ५६.८२ टक्के (वर्ग तिसरा)               ४५.८४ टक्के (वर्ग पाचवा)               ३३.८२ टक्के (वर्ग आठवा)बुलडाणा- ६८.४ टक्के (वर्ग तिसरा)           ५६.७४ टक्के (वर्ग पाचवा)            ४५.३५ टक्के (वर्ग आठवा)

टॅग्स :Akola cityअकोला शहरeducationशैक्षणिक