अकोला: राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत अत्यल्प वेतनावर काम करणाºया कंत्राटी कर्मचाºयांना कोरोना संकट काळात १५ टक्के वेतनवाढ झाल्याने मोठा दिलासा मिळाला; मात्र जे कर्मचारी गत नऊ ते दहा वर्षांपासून कार्यरत आहेत त्यांना अपेक्षित वेतनवाढ नसल्याने जुन्या कर्मचाºयांमध्ये नाराजीचा सूर उमटत असल्याचे चित्र राज्यभरात सुरू आहे.केंद्र शासनाने पी.आय.पी. २०२०-२१ मध्ये राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत कर्मचाºयांना वेतन सुसूत्रीकरण प्रस्तावाला मंजुरी दिली. त्यानुसार, वेतन सुसूत्रीकरणाची अंमलबजावणी १ एप्रिल २०१८ पासून करण्यात येणार आहे. यामध्ये राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान आणि राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानातील सर्व कर्मचाºयांचा समावेश आहे. वेतन सुसूत्रीकरणाची अंमलबजावणी करण्यासाठी १ एप्रिल २०१८ चे वेतन ग्राह्य धरण्यात येणार आहे. त्यामुळे नव्याने रूजू झालेल्या कर्मचाºयांना भरघोस वेतनवाढ मिळणार असल्याने राज्यभरातील राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत कर्मचाºयांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. तर दुसरीकडे मागील नऊ ते दहा वर्षांपासून राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत कर्मचाºयांना आधिच कमी वेतन असताना वेतनवाढही कमी असल्याने त्यांच्यामध्ये नाराजीचा सूर उमटू लागला आहे.लेखी आदेशाची प्रतीक्षा!सूत्रांच्या माहितीनुसार, वेतनवाढीसंदर्भात जुन्या कर्मचाºयांमध्ये नाराजीचे वातावरण असल्याने वरिष्ठ स्तरावर या कर्मचाºयांनाही समान वेतनवाढ लागू करण्याचे तोंडी आदेश देण्यात आल्याची माहिती आहे; परंतु जोपर्यंत याबाबत लेखी आदेश मिळत नाहीत, तोपर्यंत राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत जुन्या कर्मचाºयांमध्ये नाराजी कायम राहणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.