अकोला: केंद्र शासनाने मुलींच्या शिक्षणासाठी प्रोत्साहन देण्यासाठी आणि मुलींचा शिक्षणातील टक्का वाढविण्यासाठी राष्ट्रीय योजनेतून प्रोत्साहन भत्ता सुरू केला असून, या राष्ट्रीय योजनेंतर्गत जिल्ह्यातील माध्यमिक शाळांमधील २0१२-१३ ते २0१४-१५ या कालावधीत पात्र विद्यार्थिनींना शिष्यवृत्ती मंजूर करण्यात आली आहे. त्यासाठी माध्यमिक शिक्षण विभागाने शाळांकडून विद्यार्थिनींची आॅनलाइन माहिती मागितली आहे.अनुसूचित जाती, जमाती प्रवर्गातील मुलींच्या शिक्षणासाठी हातभार लागावा या उद्देशाने केंद्र शासनाने राष्ट्रीय योजना सुरू केली. या योजनेतून दहावी उत्तीर्ण करणाºया विद्यार्थिनींना तीन हजार रुपयांची शिष्यवृत्ती प्रोत्साहन म्हणून देण्यात येते. माध्यमिक शाळेतील पात्र विद्यार्थिनींना २0१२-१३ ते २0१४-१५ या कालावधीत शासनाकडून शिष्यवृत्ती मंजूर करण्यात आली आहे. त्यामुळे या विद्यार्थिनींची इयत्ता दहावी पास किंवा नापास झाल्याबद्दल आॅनलाइन माहिती भरणे आवश्यक आहे. अकोला जिल्ह्यातील माध्यमिक शाळांमध्ये इयत्ता नववीमध्ये शिकत असताना, अनुसूचित जाती, जमाती संवर्गातील विद्यार्थिनींची माहिती शासनाकडे सादर करण्यात आली होती. त्या विद्यार्थिनी दहावी पास झाल्या आहेत की नापास झाल्या आहेत, याची माहिती आॅनलाइन भरायची आहे. या विद्यार्थिनींची माहिती आॅनलाइन न भरल्यास त्यांना शिष्यवृत्ती मिळणार नाही. ज्या शाळांमधील विद्यार्थिनी पात्र ठरलेल्या आहेत, त्या शाळांची यादी शिक्षणाधिकारी माध्यमिक कार्यालयाकडून प्रसिद्ध करण्यात येणार आहे. यादीमध्ये नाव असणाºया शाळांच्या मुख्याध्यापकांनी १७ जानेवारीपर्यंत शाळेचे नाव, परीक्षेचे वर्ष, परीक्षेचा महिना, परीक्षा पास किंवा नापास, विद्यार्थिनीचा बैठक क्रमांक, मिळालेले गुण, पैकी गुण, गुणांची टक्केवारी, विद्यार्थिनीचा आधार कार्ड क्रमांक, राष्ट्रीयीकृत बँकेचे नाव, खाते क्रमांक, आयएफएससी कोड, विद्यार्थिनीचा मोबाइल क्रमांक आदी माहिती आॅनलाइन भरावी किंवा शिक्षणाधिकारी कार्यालयाकडे जमा करावी, अशी माहिती शिक्षणाधिकारी प्रकाश मुकुंद, शिक्षण उपनिरीक्षक आत्माराम राठोड, सुरेश बाविस्कर यांनी दिली.जिल्ह्यातील २,२00 विद्यार्थिनींना राष्ट्रीय योजनेतून प्रत्येकी ३ हजार रुपये शिष्यवृत्ती मंजूर झाली आहे. शाळांनी एससी, एसटी प्रवर्गातील दहावी उत्तीर्ण विद्यार्थिनींची माहिती द्यावी. विद्यार्थिनी शिष्यवृत्तीपासून वंचित राहिल्यास, त्याची जबाबदारी मुख्याध्यापकांची राहील.- प्रकाश मुकुंद, शिक्षणाधिकारी
राष्ट्रीय योजनेतून अकोला जिल्ह्यातील२२00 विद्यार्थिनींना प्रोत्साहन भत्ता!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2018 2:10 PM
अकोला: केंद्र शासनाने मुलींच्या शिक्षणासाठी प्रोत्साहन देण्यासाठी आणि मुलींचा शिक्षणातील टक्का वाढविण्यासाठी राष्ट्रीय योजनेतून प्रोत्साहन भत्ता सुरू केला.
ठळक मुद्देमाध्यमिक शाळांमधील २0१२-१३ ते २0१४-१५ या कालावधीत पात्र विद्यार्थिनींना शिष्यवृत्ती मंजूर करण्यात आली आहे. त्यासाठी माध्यमिक शिक्षण विभागाने शाळांकडून विद्यार्थिनींची आॅनलाइन माहिती मागितली आहे.ज्या शाळांमधील विद्यार्थिनी पात्र ठरलेल्या आहेत, त्या शाळांची यादी शिक्षणाधिकारी माध्यमिक कार्यालयाकडून प्रसिद्ध करण्यात येणार आहे.