अकोला - केंद्रामध्ये भाजपाची सत्ता आल्यानंतर वर्षाला दोन कोटी बेरोजगार युवकांना नोकरी देण्याचे आश्वासन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दिले होते, प्रधानमंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनानुसार चार वर्षात तब्बल ८ कोटी बेरोजगारांना नोकरी देणे अपेक्षित होते मात्र केवळ पाच लाख नोकºया देण्यात आलेल्या आहे. त्यामूळे या निष्क्रीय सरकारच्या विरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेसव्दारे पश्चिम विदर्भात तीन दिवस युवा आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे विदर्भ समन्वयक संग्रामभैय्या गावंडे यांनी बुधवारी येथे आयोजीत पत्रकार परिषदेत दिली.राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते पाटील यांच्या मार्गदर्शनात १२ मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर हा बेरोजगार युवकांचा मोर्चा धडकणार आहे. देशातील केवळ पाच लाख युवकांना नोकºया देण्यात आल्याचे अर्थमंत्र्यांनी कबुल केले आहे. यासोबतच नोटबंदीमुळे हजारो युवकांचे रोजगार गेले असून छोटे उद्योग व व्यवसाय बंद पडले आहेत. कौशल्य विकास योजना कार्यान्वीत केली मात्र अद्याप एकाही बेरोजगार युवकाला नोकरी देण्यात आली नसल्याचा आरोप संग्राम गावंडे यांनी केला. या योजनेत राज्यात सात हजार २५२ प्रशिक्षण संस्थाना सरकारने एक छदामही दिला नाही. त्यामूळे या ठिकाणी काम करणारे तब्बल ५५ हजार नोकरदार बेरोजगार झाले आहेत. डी. एड. बी. एड झालेल्या उमेदवारांना नोकरी नाही. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या दरवर्षी ४५० ते ५०० जागा भरल्या जायचा मात्र यावर्षी केवळ ५९ जागांची जाहीरात काढण्यात आली. ओबीसी विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती बंद पडल्यात जमा आहे. मॅनेजमेंट कोटयामध्ये प्रवेश घेणाºया विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती बंद करण्यात आली आहे. एक नव्हे तर शेकडो समस्या या सरकारने उभ्या केल्या असून या विरोधात युवा आक्रोश मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती संग्राम गावंडे यांनी दिली. पत्रकार परिषदेला जिल्हाध्यक्ष अॅड. महेश सरप पाटील, पंकज गावंडे, मनोज तिवारी, विजय ताले, विपुल घोगरे, बुढन गाडेकर, अमर डिकाव, देवेंद्र शिरसाट, शैलेष बोदडे, डॉ. अनंत मानकर, गोपाल चतरकर उपस्थित होते.
राष्ट्रवादी युवक काँग्रेसद्वारे जिल्हाधिकारी कार्यालयावर युवा आक्रोश मोर्चाचे आयोजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 07, 2018 4:19 PM
अकोला - निष्क्रीय सरकारच्या विरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेसव्दारे पश्चिम विदर्भात तीन दिवस युवा आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे विदर्भ समन्वयक संग्रामभैय्या गावंडे यांनी बुधवारी येथे आयोजीत पत्रकार परिषदेत दिली.
ठळक मुद्देराष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते पाटील यांच्या मार्गदर्शनात १२ मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर हा बेरोजगार युवकांचा मोर्चा धडकणार आहे.कौशल्य विकास योजना कार्यान्वीत केली मात्र अद्याप एकाही बेरोजगार युवकाला नोकरी देण्यात आली नसल्याचा आरोप संग्राम गावंडे यांनी केला. एक नव्हे तर शेकडो समस्या या सरकारने उभ्या केल्या असून या विरोधात युवा आक्रोश मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती संग्राम गावंडे यांनी दिली.