अकोला : राष्ट्रीय स्वयसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी भारतीय सैन्याची तुलना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्याशी करून एक प्रकारे भारतीय सैनिकांचा अपमान केल्याचा आरोप करीत, राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्यावतीने शुक्रवारी अकोला येथील मुख्य डाक घरासमोरच्या चौकात निदर्शने करून त्यांच्या वक्तव्याचा जाहीर निषेध करण्यात आला.भारतीय सैनिक हे जीवाची पर्वा न करता रात्रंदिवस देशाच्या रक्षणासाठी सीमेवर तैनात असतात. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी मात्र संघाच्या कार्यकर्त्यांची तुलना भारतीय सैन्यासोबत केली आहे. हा भारतीय सैनिकांचा एक प्रकारे अपमान असून, या वक्तव्याबाबत मोहन भागवत यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करावा, तसेच संघावर बंदी आणावी, अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्यावतीने करण्यात आली आहे.सरसंघचालकांच्या वक्तव्याचा निषेध म्हणून राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड. महेश सरप पाटील यांच्या नेतृत्वात स्वराज्य भवन येथून रॅली काढून मुख्य डाकघरासमोर निदर्शने करण्यात आली. यावेळी महानगर अध्यक्ष राजकुमार मुलचंदानी, बुढन गाडेकर, डॉ. अनंतकुमार मानकर, बाळासाहेब तायडे, आशिष सावळे, अशोक लाड, शौकत अली शौकत, सचिन लहाळे, देवेंद्र शिरसाठ, आशिष वानखडे, शैलेश बोदडे, अमर डिकाव, नितीन देशमुख, महिला कार्याध्यक्ष भारती निम, महादेवराव बोर्डे, शेखर सरप पाटील, माजी महानगर अध्यक्ष अजय तापडीया, मनोज तिवारी, डॉ. गणेश महल्ले, दत्तात्रय महल्ले, गजानन सिरसाट, विजयकुमार ताले, गोपाल चतरकार, सुधिर ताले, पुरुषोत्तम ताले, श्रीमंत जवादे, अजय डाबेराव, प्रताप सोळंके, विठ्ठल सोळंके, मयूर दुरबळे, रवी गिते, गोविंद पांडे, संदिप तायडे, प्रकाश मोरे, संतोष अवचार, अंकुश धुमाळे, जीवन मोडक आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
सरसंघचालकांच्या वक्तव्याचा अकोल्यात राष्ट्रवादी युवक काँग्रेसने केला निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2018 3:44 PM
अकोला : राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्यावतीने शुक्रवारी अकोला येथील मुख्य डाक घरासमोरच्या चौकात निदर्शने करून राष्ट्रीय स्वयसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या वक्तव्याचा जाहीर निषेध करण्यात आला.
ठळक मुद्देया वक्तव्याबाबत मोहन भागवत यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करावा, तसेच संघावर बंदी आणावी, अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्यावतीने करण्यात आली आहे.राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड. महेश सरप पाटील यांच्या नेतृत्वात स्वराज्य भवन येथून रॅली काढून मुख्य डाकघरासमोर निदर्शने करण्यात आली. राष्ट्रीय स्वंयसेवक संघाने देशाची माफी मागावी अशी मागणीही यावेळी करण्यात आली.