महसूल विभागांतर्गत डाक वितरण, जमीन महसूल गोळा करणे, आपत्कालीन परिस्थितीत वरिष्ठांना माहिती कळविणे, निवडणूक प्रक्रिया, पीएम किसान, सातबारा वितरण, गौण खनिज पथकात सहभाग ‘इ पीक पाहणी’ कार्यक्रम अशा प्रकारे महसूल विभागांतर्गत विविध प्रकारची कामे कोतवाल कर्मचाऱ्यांना करावी लागतात.
......................................................
कोतवाल म्हणतात....
कोतवाल कर्मचाऱ्यांना कामाचा व्याप मोठ्या प्रमाणात आहे. मात्र कामाच्या मोबदल्यात दरमहा ७ हजार ५०० रुपये मिळणारे मानधन तुटपुंजे आहे. कोतवालांना चतुर्थ श्रेणीत समाविष्ट करावे, अशी आमची मागणी आहे; मात्र ती अद्याप प्रलंबित आहे. तसेच पदोन्नतीमध्ये कोतवाल कर्मचाऱ्यांना आरक्षण देण्यात आले पाहिजे.
सतीष वानखडे, कोतवाल, अकोट
........................
कोतवाल कर्मचाऱ्यांना करावयाच्या कामांचा व्याप मोठ्या प्रमाणात वाढला असून, दरमहा केवळ ७ हजार ५०० रुपये मिळणारे मानधन अत्यंत कमी आहे. त्यामुळे शासनाने कोतवालाच्या मानधनात वाढ करावी आणि कोतवाल कर्मचाऱ्यांचा चतुर्थ श्रेणीत समावेश करण्याची गरज आहे.
- कुणाल शिरसाट, कोतवाल, अकोला