‘अमृत’ याेजनेंतर्गत शहरातील जलवाहिनीचे जाळे अंथरण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. ‘एपी ॲन्ड जीपी’ नामक एजन्सीकडून जलवाहिनीचे जाळे व जलकुंभ उभारणीचे काम केले जात आहे. यासाठी केंद्र व राज्य शासनाकडून ११० काेटींचा निधी मंजूर झाला आहे. यादरम्यान, मागील पंधरा ते वीस दिवसांपासून एजन्सीच्यावतीने जवाहर नगर चाैकातील मुख्य जलवाहिनीला व्हाॅल्व्ह बसवणे व जाेडणी करण्याचे काम केले जात आहे. सिव्हिल लाइन चाैक परिसरातील ग्लाेबल हाॅस्पिटलच्या बाजूने ते थेट जवाहरनगर चाैकापर्यंत जलवाहिनीचे जाळे टाकण्यात आले. त्यासाठी माेठ्या प्रमाणात खाेदकाम करण्यात आले. मंगळवारी या जलवाहिनीला ठिकठिकाणी माेठ्या प्रमाणात गळती लागल्यामुळे रस्त्यावरून पाण्याचे लाेट वाहत असल्याचे पहावयास मिळाले. यामुळे मुख्य मार्ग चिखलमय झाल्याने वाहनचालकांना चांगलीच कसरत करावी लागली.
चिखलात फसले वाहन
जवाहरनगर चाैकात मुख्य जलवाहिनीची जाेडणी व व्हाॅल्व्ह बसविण्याच्या कामासाठी भलामाेठा खड्डा खाेदून ठेवण्यात आला आहे. या खड्ड्याच्या अवतीभाेवती कंत्राटदाराने बॅरिकेड उभारणे अपेक्षित हाेते. तसे न केल्यामुळे वाहनचालकांना खड्डा असल्याचे लक्षात येत नाही. या ठिकाणी साचलेल्या पाण्याचा अंदाज न आल्यामुळे चारचाकी वाहन फसल्याने संबंधितांना मानसिक त्रास सहन करावा लागला.
.....फाेटाे, लाेकमत मेलवर...