अकोला : जागतिक महिला दिनाच्या औचित्य साधून शहरातील गजबलेल्या वाहतुक व्यवस्थेची जबाबदारी एनसीसीच्या मुलींनी रविवारी सांभाळली. तर वाहतुक पोलिस निरीक्षक यांची जबाबदारी प्रा. श्वेता मेंढे यांनी यशस्वीरीत्या सांभाळली. पोलीस अधीक्षक अमोघ गावकर यांच्या मार्गदर्शनाखाली शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक गजानन शेळके यांनी अभिनव प्रयोग राबवित त्यांना सहकार्य केले.मुलीं आणि महिला कोणत्याही क्षेत्रात आव्हानात्मक काम करू शकतात हा विश्वास जागविण्यासाठी तसेच वाहतूक पोलिसांची ड्युटी किती कष्टाची व कठीण आहे हे मुलींना समजावे व त्या अनुषणगाने पोलिसां विषयी व त्यांचे कामाप्रति त्यांचे मनात आदराची भावना वृद्धिंगत व्हावी या दृष्टीने एनसीसीच्या ६० मुलींनी रविवारी जागतीक महिला दिनानीमीत्त वाहतुक व्यवस्थेची जबाबदारी सांभाळली. यावेळी त्यांनी बेशीस्त वाहनचालकांना अडवून त्यांचे दस्तावेत तपासणी करीत त्यांच्यावर दंडात्मक कारवाईही केली. एक सामान्य नागरिक म्हणून वाहतूक नियमाची माहिती होऊन वाहतूक नियम पाळण्याची जाणीव त्यांचे मध्ये निर्माण व्हावी म्हणून एनसीसीच्या ६० मुलींनी त्यांच्या शिक्षकांसह सकाळी 9 वाजता शहर वाहतूक विभागाचे कार्यालयात बैठक घेतली. त्यानंतर जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा देऊन वाहतूक पोलिसांच्या कामकाज विषयी शहर वाहतूक निरीक्षक गजानन शेळके यांनी माहिती दिली. शहरातील प्रदूषणामुळे मुलींना मास्कचे वाटप करण्यात आले. त्यानंतर नेहरूपार्क चौक, हुतात्मा, भगत सिंग, धिंग्रा, अशोक वाटिका, सिव्हिल लाईन, रतनलाल प्लॉट, पोस्ट आॅफिस, टॉवर 'ा महत्वाच्या चौकातील वाहतूक पोलीस सोबत त्यांनी वाहतुक व्यवस्थेची जबाबदारी सांभाळली. स्पीडगन कारची घेतली माहितीवाहतूक शाखेला प्राप्त नवीन इंटरसेप्टर वाहनातील स्पीडगण कसे काम करते ह्या विषयी महिला शिक्षकांना व मुलींना माहिती करून देण्यात आली. लेफ्टनंट पदावर असलेल्या आर डी जी महिला महाविद्यालयाच्या शारीरिक शिक्षण संचालक प्राध्यापक श्वेता मेंढे ह्यांना वाहतूक पोलीस निरीक्षक म्हणून प्रभार देऊन कामकाजा विषयी माहिती दण्यात आली. यावेळी प्रा डॉक्टर अश्विनी बलोटे, अर्चना रंजनकर यांची उपस्थिती होती. यांचा होता सहभागया उपक्रमात शिवाजी महाविद्यालय,आर डी जी महाविद्यालय, डी आर पाटील विद्यालयील श्रीकांत रत्नपारखी, नंदकिशोर थोटे, अशोक नांदूरकर या शिक्षकांनी सहकार्य केले. जागतिक महिला दिनी प्रत्यक्ष पोलिसांच्या कामात सहभागी करून घेतल्या बद्दल सर्व मुलींनी समाधान व्यक्त करून पोलीस प्रशासनास धन्यवाद दिले.