- संजय खांडेकरअकोला : आधारभूत किमतीपेक्षा कमी किमतीत खरेदी केल्यास दंडात्मक कारवाईच्या प्रस्तावामुळे नॅशनल कमोडिटी अॅण्ड डेरिव्हेटिव्ह एक्सचेंजची चांगलीच कोंडी झाली आहे. बाजार समितीला आव्हान देत देशभरातील शेतमाल खरेदीसाठी ‘एनसीडीईएक्स’ने आपले जाळे पसरविले; मात्र शासनाने ‘एमएसपी’चा कायदा पुढे आणल्याने ‘एनसीडीईएक्स’ची यंत्रणा कोसळण्याचे संकेत आहेत.देशभरातील शेतमाल विकत घेण्यासाठी स्थानिक पातळीवर कृषी उत्पन्न बाजार समिती कार्यरत असते. मागणी-पुरवठ्यांवरून शेतमालाच्या भावाचे चढ-उतार बाजारपेठेत असतात. शेतकऱ्यांच्या मालाभोवती अडते-व्यापारी असतात. शेतमालावर व्यापार करण्यासाठीच ‘एनसीडीईएक्स’ने जन्म घेतला. व्यापारी-सटोडियांची कोट्यवधींची अर्थव्यवस्था एनसीडीईएक्सभोवती दररोज फिरते. जर एमएसपीचे दंडक लागले, तर एनसीडीईएक्सचे गोदाम ओस पडतील. त्यामुळे व्यापारी आणि एनसीडीईएक्सची यंत्रणा प्रस्तावित कारवाईमुळे संभ्रमात सापडली आहे.*२ लाख ३५ हजार १०६ क्विंटल साठा‘एनसीडीईएक्स’चे जयपूरपासून घेऊन श्रीगंगानगर, पटना, अहमदाबाद, जोधपूर, कोटा, सांगली, निझामाबाद, बसमत आणि अकोलापर्यंत देशभरात हजारो गोदाम आहेत. या गोदामात २ लाख ३५ हजार १०६ क्विंटल विविध शेतमालाचा साठा २३ आॅगस्ट १८ पर्यंत साठविलेला आहे. जर एमएसपीचे दंडक आले, तर लक्षावधींच्या साठ्यावर विपरीत परिणाम दिसून आल्याशिवाय राहणार नाही. याचा कोट्यवधींचा फटकाही सोसावा लागेल.*अकोल्याच्या गोदामात ७० हजार क्विंटल साठा‘एनसीडीईएक्स’चे अकोला परिसरात ५४ गोदाम असून, त्यामध्ये शेतकरी आणि व्यापाºयांचा ७०,९८६ क्विंटलचा शेतमाल साठविलेला आहे. यामध्ये हरभरा ५००५९ क्विंटल आणि सरकी ढेप २०९२७ क्विंटल साठा आहे.