हिवरखेड पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या अडगाव येथील महावितरणच्या कार्यालयात सिरसोली येथील रमीजअली मीरसाहेब यांना वीज कनेक्शन मिळण्यासाठी अर्ज घेऊन रामप्रभू तराळे, मीरसाहेब, ऋषिकेश तराळे, गौरव ढोले हे गेले असता कनिष्ठ अभियंता विशाल गावकरी यांनी वीज कनेक्शन मिळण्यासाठी यापूर्वीची असलेली वीजबिलाची थकबाकी भरा नंतरच अर्ज सादर करा, असे सांगितले. त्यामुळे कार्यलयात वाद निर्माण होऊन कनिष्ठ अभियंता गावकरी यास मारहाण करून शिविगाळ केली. याप्रकरणात गावकरी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, पोलिसांनी रामप्रभू तराळे यांच्यासह चौघांविरुद्ध भादंविच्या कलम ३५३, ३२३, ५०४ नुसार गुन्हा दाखल केला.
-----------------------------
ग्राहकांना वीज कनेक्शन मिळण्यास का विलंब होत आहे, याचा जाब विचारण्यास कार्यालयात गेलो असता महावितरणच्या अधिकाऱ्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे कार्यकर्ते अधिकाऱ्याच्या अंगावर जात असल्याने मी कार्यकर्त्यांना आवरले. अधिकाऱ्यास मारहाण होऊ दिली नाही, याचे माझ्याकडे व्हिडिओ आहेत. अधिकारी नवीन असल्याने त्यांना काम समजून घेण्यास विलंब लागतो, असे दुसरे अधिकारी सांगत होते. ग्राहकांना नाहक त्रास होत असल्याने वीजग्राहकांमध्ये अधिकाऱ्याबाबतीत आक्रोश आहे.
- रामप्रभू तराळे, राष्ट्रवादी काँग्रेस