अकोला : जिल्ह्यात हजारो शेतकऱ्यांनी सोयाबीन बियाण्यांची लागवड केली; परंतु बियाणे निकृष्ट निघाल्यामुळे शेतजमिनीत उगवले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना दुबार पेरणीसह आर्थिक भुर्दंडदेखील सहन करावा लागला. निकृष्ट बियाणे प्रकरणात कंपन्यांवर फौजदारी करण्यासह शेतकºयांना बियाण्यांसह आर्थिक नुकसानभरपाई देण्याच्या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने मंगळवारी दुपारी जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयावर धडक देत, कार्यालयाच्या परिसरात ट्रॅक्टरने निकृष्ट सोयाबीन बियाण्यांची लागवड केली.राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संग्राम गावंडे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शिवा मोहोड यांच्या नेतृत्वात जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयात मंगळवारी दुपारी आंदोलन करण्यात आले. यावेळी कृषी अधीक्षक अधिकारी मोहन वाघ यांना निवेदन देण्यात आले. निवेदनामध्ये जिल्ह्यात यावर्षी शेतकºयांनी मोठ्या प्रमाणात सोयाबीनची पेरणी केली. परंतु यावर्षी हजारो शेतकºयांचे सोयाबीन बियाणे उगवले नाही. त्यामुळे बियाण्यांच्या खर्चासह खते, पेरणीचा खर्च, मशागतीचा खर्च वाया गेला. ज्या कंपन्यांचे सोयाबीन बियाणे उगवले नाही, त्या कंपन्यांवर गुन्हे दाखल करा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसने केली. तसेच पीक विमा शेतकºयांना मिळाला नाही. तो तातडीने देण्यात यावा, नुकसान झालेल्या शेतकºयांना बियाण्यांच्या खर्चाची नव्हे तर खते, पेरणीचा खर्च, मशागतीचा खर्च यासह त्याच्या उत्पादनाचे झालेल्या नुकसानाची भरपाई द्यावी. अन्यथा रुमणे मारो आंदोलन करण्याचा इशारा राष्ट्रवादी युवक काँग्रेसने दिला आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष शिवाजीराव म्हैसने, सरचिटणीस परिमल लहाने यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.
कृषी अधीक्षक कार्यालयात राष्ट्रवादी काँग्रेसने केली निकृष्ट सोयाबीन बियाण्यांची पेरणी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2020 4:31 PM