अकोला: आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुका लक्षात घेता राष्ट्रवादी पक्षाने शहर कार्यकारिणीत फेरबदल करण्याचा निर्णय घेत राष्ट्रवादीच्या कार्याध्यक्षपदी माजी उपमहापौर रफिक सिद्दिकी तसेच राज्यस्तरीय विशेष समितीच्या सदस्यपदी सैय्यद युसूफ अली यांची नियुक्ती केली. यानिमित्त राकाँचे प्रदेश उपाध्यक्ष तथा सहकार नेते डॉ. संतोष कोरपे, माजी आ. तुकाराम बिरकड, प्रदेश सरचिटणीस प्रा. विश्वनाथ कांबळे, विजयराव देशमुख यांनी गांधी रोडस्थित पक्ष कार्यालयात नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा यथोचित सत्कार केला.राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुनर्बांधणीसाठी शरद पवार यांच्या कन्या खा. सुप्रिया सुळे सरसावल्या आहेत. गतवर्षी अकोला दौºयात त्यांनी जिल्हा कार्यकारिणीसह शहर कार्यकारिणीत फेरबदल करण्याचा निर्णय घेतला होता. पक्षात जुन्या व नवीन पदाधिकाºयांचा ताळमेळ ठेवण्याच्या अनुषंगाने महानगर कार्यकारिणीत माजी उपमहापौर रफिक सिद्दिकी यांचा समावेश करण्यात आला. राज्यस्तरीय विशेष समितीच्या सदस्यपदी सैय्यद युसूफ अली यांची नियुक्ती करण्यात आली असून, अल्पसंख्याक विभागाच्या महानगराध्यक्षपदी हाजी काजी अतिकोद्दीन, महानगर सेवादल अध्यक्षपदी शेख महेबूब यांची नियुक्ती केली. संबंधित नवनियुक्त पदाधिकाºयांचा राकाँचे प्रदेश उपाध्यक्ष तथा सहकार नेते डॉ. संतोष कोरपे, माजी आ. तुकाराम बिरकड, प्रदेश सरचिटणीस प्रा. विश्वनाथ कांबळे, विजयराव देशमुख, ज्येष्ठ नेते श्याम अवस्थी, अरविंद घोगरे, महिला प्रदेश चिटणीस मंदा देशमुख, मनोहर पाटील, सेवादल जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर माळी, भाऊराव सुरडकर, महिला महानगर कार्याध्यक्ष भारती निम, दिलीप आसरे, नजीर पहेलवान, सामाजिक न्याय विभागाचे अध्यक्ष धमेंद्र सिरसाट, शंकर कंकाळ, ओबीसी सेलचे अनिल मालगे, युवक महानगराध्यक्ष तथा नगरसेवक नितीन झापर्डे आदींच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला. याप्रसंगी नगरसेवक फय्याज खान, गटनेत्या शीतल गायकवाड, नगरसेवक अब्दुल रहीम पेंटर, मनोज गायकवाड, देवानंद ताले, दिलीप देशमुख, अफसर कुरेशी, सरला वरघट, अजय मते, संतोष ठाकूर, मुन्ना ठाकूर, मन्नान सिद्दिकी यांसह असंख्य पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन युवक उपाध्यक्ष बुढन गाडेकर, आभार प्रदर्शन संदीप तायडे यांनी केले.