शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

अकोल्यातील राष्ट्रवादीच्या नगरसेविकेसह पतीविरुद्ध गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2017 11:00 PM

अकोला : सांगितल्यानंतरही प्रभागामध्ये सफाई न केल्याच्या कारणावरून सफाई कामगारास शिवीगाळ करणार्‍या राष्ट्रवादी काँगेसच्या नगरसेविका उषा विरक व त्यांचे पती जगजितसिंह विरक यांच्याविरुद्ध कोतवाली पोलिसांनी शुक्रवारी सायंकाळी गुन्हा दाखल केला. 

ठळक मुद्देसफाईच्या कारणावरून वाद सफाई कामगारास शिवीगाळ

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : सांगितल्यानंतरही प्रभागामध्ये सफाई न केल्याच्या कारणावरून सफाई कामगारास शिवीगाळ करणार्‍या राष्ट्रवादी काँगेसच्या नगरसेविका उषा विरक व त्यांचे पती जगजितसिंह विरक यांच्याविरुद्ध कोतवाली पोलिसांनी शुक्रवारी सायंकाळी गुन्हा दाखल केला. अकोला महापालिकेचे सफाई कामगार असलेले संजय बाबूलाल बेडवाल (४९ रा. कैलास टेकडी) यांच्या तक्रारीनुसार, शुक्रवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास ते स्वराज्य भवन परिसरात काम करीत असताना, याठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका उषा विरक आणि त्यांचे पती जगजितसिंह विरक आले आणि त्यांनी संजय बेडवाल यांना, प्रभागामध्ये तुला सफाई करण्यास सांगितले होते. मग तू सफाईचे काम का केले नाही. असे म्हणत, त्यांच्यासोबत वाद घातला आणि अश्लील शिवीगाळ केली. त्यांच्या तक्रारीनुसार, कोतवाली पोलिसांनी विरक दाम्पत्याविरुद्ध भादंवि कलम २९४, ५0६, नुसार गुन्हा दाखल केला. 

सफाई कामगाराला आम्ही शिवीगाळ केली नाही. त्याने दिलेली तक्रार खोटी आहे. उलट तोच माझ्यासोबत उद्धट भाषेत बोलला. सफाई कामगार काम करीत नसेल, तर त्याला जाब विचारणे हा गुन्हा आहे का? स्वराज्य भवनमध्ये अनेक लोक साक्षीदार आहेत. मी शिवीगाळ केली नसल्याचे हे लोकसुद्धा सांगतील. हा सफाई कामगार माझ्यासोबत अर्वाच्च भाषेत बोलल्यामुळे मीसुद्धा त्याची पोलिसात तक्रार केली आहे. - उषा विरक, नगरसेविका

टॅग्स :Akola cityअकोला शहरNational Congress Partyनॅशनल काँग्रेस पार्टीCity kotwali Police Stationसिटी कोतवाली पोलीस स्टेशन