अकोला : गेल्या अनेक वषार्पासून विविध समस्यांनी शहराला ग्रासले आहे. अकोला शहराला विकासाच्या वाटेवर नेण्यासाठी मिशन अकोला विकास ही चळवळ सुरू करण्यात आली. राज्यातील विकसीत शहरांच्या धरतीवर अकोला शहराचा विकास व्हावा यासाठी सर्व मतभेद विसरून सर्व समाजातील प्रतिष्ठित नागरिकांनी एकत्र येण्याची गरज आहे, असे प्रतिपादन मिशन अकोला विकासचे समन्वयक मदन भरगड यांनी केले. मिशन अकोला विकासच्या गणेशघाट स्थित जनसंपर्क कार्यालयात विविध समाजाच्या अध्यक्ष व सचिवांना अकोला गौरव पुरस्कार देऊन सन्मानीत करण्यात आले यावेळी त्यांनी वरील विचार व्यक्त केले.कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रख्यात समाज सेवक महादेवराव भुईभार होते तर विष्णुपंत मेहरे, मनोहरराव हरणे,विनायकराव पवार, कृष्णा अंधारे, मोहन नागलकर, सुधीर ढोणे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.कुणबी पाटील, मराठा, प्रांतिक तैलिक, माळी, भावसार, क्षत्रिय मराठा, दखनी मराठा, मराठा लोहार, राठोड तेली या समाजांचे मा.अध्यक्ष व सचिव अविनाश पाटील ( नाकट ), महादेवराव कौसल, बबनराव कानकिरड, दिपकभाऊ इचे, विजयभाऊ गुल्हाने, सुभाश नवलखे, श्रीकृष्ण विखे, डॉ. धनंजय नालट, माणिकराव शेळके, समाधान महल्ले, सुभाष दातकर, प्रमोद सरोदे, चंद्रकांत झटाले, शिवदास पाटिल गोंड, दिनकरराव सुरोसे, श्याम सुर्वे, संजय जसनपुरे, दिपक भिरड ,मनीष हिवराळे, अनिल मावळे, सागर दळवी, अशोक पटोकार, रजनिश ठाकरे, डॉ. अमोल रावणकार, प्रमोद जानोरकार, डॉ. रणजित सपकाळ, डॉ. विनोद बोर्डे, नरेश सुर्यवंशी , दिपक शिंदे, किसनराव सुखदाने, देवानंद चव्हाण, रमेश गोतमारे यांना अकोला गौरव पुरस्कार देऊन सन्मानीत करण्यात आले. राजेश पाटील यांनी संचालन व आभार प्रदर्षन केले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राजेंद्र चितलांगे, गणेश कटारे, अभिषेक भरगड, बाळू पाटील, मानोज तायडे, ज्ञानेष्वर गावंडे, दिपक गावंडे, विजय ढोरे, सोमनाथ अडगावकर, रणजित महल्ले, स्वप्नील अहिर, अशोक अस्वारे, कुदंन गुप्ता, शुभम भरगड, गोपाल शर्मा, अजय रावणकार, सुनिल साठे यांनी परिश्रम घेतले.
शहराच्या विकासासाठी नागरिकांनी एकत्र येण्याची गरज : मदन भरगड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2019 6:16 PM