षण्मुगा नाथन, वृक्षमित्र, अकाेला़
---------------
वृक्षसंवर्धनासाठी अविरत प्रयत्न सुरू आहेत. यामध्ये सर्वांचा सहभाग लाभत आहे. वर्षभरात बीज गाेळा करून सीड बॅंकेच्या माध्यमातून एक लाख सीड्स बाॅलची निर्मिती करून ते परिसरात टाकण्यात आले. सद्यस्थितीत वडाच्या कलमांचे राेपण सुरू आहे. वृक्षाराेपणसाठी राेपे ही माेफत मिळावेत, ही मानसिकता बदलणे गरजेचे आहे. पर्यावरणाबाबत तुम्हाला निष्ठा असेल तर तुम्ही वडाच्या कलमांचे राेपण करू शकता. आंब्याच्या बियांचे राेपण करू शकता. झिराे बजेटमध्येही झाडे लावता येतात. याची जाणीव नागरिकांना हाेणे गरजेचे आहे. राेहयाेच्या माध्यमातून वृक्ष संगाेपनासाठी निधी मिळताे. मात्र त्यासाठी आधी स्वत: पुढाकार घेऊन वृक्षाराेपण करणे गरजेचे आहे. गावागावात वृक्षराेपणाची माेहीम हाती घेणे गरजेचे आहे. राज्यात सध्या ‘एक विद्यार्थी, एक वृक्ष’ ही माेहीम सुरू झाली आहे. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांचेही निर्देश आहेत. मात्र अकाेल्यात दाेन लाख वृक्षांचे राेपण हाेणे आवश्यक असताना केवळ २० हजार वृक्षांची राेपेच उपलब्ध आहेत. ही बाब दु:खदायक आहे. वृक्षसंवर्धनासाठी प्रामाणिक प्रयत्नांची गरज आहे. तसे झाल्यासच आम्हाला ‘वृक्षवल्ली आम्हा साेयरे वनचरे’ म्हणण्याचा अधिकार आहे.
-------------------
वृक्षसंवर्धनाच्या ‘अकाेला पॅटर्न’ची दखल घेत इतर जिल्ह्यात वृक्ष संवर्धन चळवळीला माेठे स्वरुप प्राप्त हाेत आहे. मग अकाेला जिल्हा मागे का राहत आहे? हा प्रश्न अनुत्तरित आहे.