माहेश्वरी समाज ट्रस्टच्या वतीने माहेश्वरी भवनात आयोजित महेश नवमीचा कार्यक्रम ऑनलाइन पद्धतीने शनिवारी आयोजित करण्यात आला होता. यावेळी डॉ. कोठारी म्हणाले, मानवी मूल्यांची अवहेलना होत असल्याबद्दल चिंता व्यक्त करीत, त्यांनी सद्यस्थितीत कोरोना विषाणूवर लसीकरण हाच एकमेव उपाय असल्याचे सांगितले.
माहेश्वरी समाज ट्रस्टचे अध्यक्ष रमेशचंद्र चांडक कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. व्यासपीठावर माहेश्वरी ज्येष्ठ संघाचे अध्यक्ष रमणभाई लाहोटी,श्रीमती तापडिया, महिला मंडळ अध्यक्ष रचना लढ्ढा, प्रगती मंडळाचे अध्यक्ष सागर लोहिया, नवयुवती मंडळाच्या अध्यक्ष राधिका लाहोटी उपस्थित होते.
प्रारंभी डॉ. अनुप कोठारी, डॉ. ज्योती कोठारी यांनी भगवान महेश पूजन करून दीप प्रज्ज्वलन केले. पंडित शिवा शर्मा यांनी वैदिक मंत्रोपच्चार केला. कार्यक्रमाला डॉ. कोठारी यांचा शांतीलाल भाला, जयप्रकाश चांडक, बीजीई सोसायटीचे अध्यक्ष ॲड. मोतीसिंह मोहता यांनी शाल, श्रीफल व मानपत्र देऊन सत्कार केला.
उत्सव प्रमुख राजेंद्र चितलांगे यांच्या हस्ते राजस्थानी पगडी देण्यात आली. डॉ. ज्योती कोठारी यांचा विजय राठी व इंदुमती मोहता यांच्या हस्ते बेल वृक्ष प्रदान करून सत्कार करण्यात आला. महेश नवमी उत्सव कार्यक्रमामध्ये समाजातील महिला व पुरुष मोठ्या संख्येने ऑनलाइन सहभागी झाले होते. संचालन माहेश्वरी समाज ट्रस्टचे प्रधान मंत्री डॉ. संदीप चांडक यांनी तर आभार प्रदर्शन सहायक मंत्री सुरेश मुंदडा यांनी केले.
कार्यक्रमाला समाज ट्रस्टचे रमेश राठी, नरेश बियाणी, अरुण कोठारी, नंदकिशोर बाहेती, नरेंद्र कुमार भाला, विनीत बियाणी, संदेश रांदड, अजय बियाणी, संजय सारडा, शंकरलाल बियाणी, सुभाष लढ्ढा, शकुंतला चांडक, अरुणा लढ्ढा, डॉ. माधुरी चांडक, पुष्पा चांडक, रमेश बाहेती, किशोर कोठारी, अनिल चांडक आदी पदाधिकारी उपस्थित होते.
फोटो: