शहरं
Join us  
Trending Stories
1
"खाऊन पिऊन बिल उधार ठेवून आले"; दावोस दौऱ्यात CM शिंदेंची १.५८ कोटींची थकबाकी, कंपनीची नोटीस
2
‘त्या’ ९ मंत्र्यांना पक्षात पुन्हा प्रवेश मिळणार नाही; शरद पवारांनी घेतला मोठा निर्णय : देशमुख
3
अबूझमाडच्या जंगलात ३० नक्षल्यांचा खात्मा; घातपाताचा डाव उधळून लावला
4
'पुतण्याचा कौटुंबिक विषय कायमचा संपला' म्हणत आमदार बबनराव शिंदेंची महायुतीला सोडचिठ्ठी
5
हरयाणात भाजपची हॅट् ट्रिक की, काँग्रेसचे होणार पुनरागमन? मतदानाला सुरुवात
6
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सार्वजनिक क्षेत्रातून प्रशंसा, कौटुंबिक व दांपत्य जीवनात सौख्य लाभेल
7
मंत्रालयात आमदारांच्या जाळीवर उड्या; विधानसभा उपाध्यक्ष झिरवाळांसह आदिवासी आमदारांचा संताप
8
नागपुरी गेट पोलीस स्टेशनवर दगडफेक; पोलीस अधिकारी आणि कर्मचारी जखमी, मोठं नुकसान
9
पुण्यात मित्राला झाडाला बांधून तरुणीवर सामूहिक बलात्कार; तीन नराधमांचा शाेध सुरू
10
राज्यातील अकृषक कर पूर्ण माफ; सरकारचा निर्णयांचा धडाका सुरूच, मंत्रिमंडळ बैठकीत ३३ निर्णय 
11
हावभाव बघूनच एकमेकींना समजून घेतो; शेफालीने सांगितले स्मृतीसोबतच्या ताळमेळीचे रहस्य
12
हार्दिकची १८ कोटींची  पात्रता आहे का? : मूडी
13
राज्यात आज धडाडणार राजकीय तोफा; मोदी वाशिम-ठाण्यात तर राहुल गांधी कोल्हापुरात
14
भारताचा दारुण पराभव, न्यूझीलंडची विजयी सलामी
15
धारावी प्रकल्पातील अनधिकृत बांधकामांसंदर्भात समिती; न्या. दिलीप भोसले अध्यक्ष, सहा सदस्यही नेमले
16
समाज घटकांसाठी महामंडळे; मंत्रिमंडळ बैठकीत जैन, बारी, तेली समाजासाठी महत्त्वाचे निर्णय 
17
पंतप्रधानांच्या डोळ्यात धूळफेक, अपूर्ण योजनेचे उद्घाटन
18
एकीकडे इराण म्हणतोय युद्ध नकोय, दुसरीकडे म्हणतोय इस्रायलवर हल्ले करणारच 
19
मोदींचे ठरले! ९ वर्षांनी पाकच्या दौऱ्यावर जाणार भारताचे परराष्ट्रमंत्री; ‘एससीओ’ परिषदेत हाेणार सहभागी
20
निवडणुकीचे सूर उमटले वाद्यांच्या बाजारात; उलाढाल वाढली, राज्यातील उमेदवारांची खरेदीसाठी धाव 

सामाजिक भेदभाव मिटवण्यासाठी क्रांतिकारक पाऊल उचलणे आवश्यक

By admin | Published: January 25, 2016 2:12 AM

तुकाराम महाराज यांच्या जयंती सोहळय़ात अरुण सावंत यांचे अवाहन.

अकोला: तुकाराम महाराजांच्या विचारांचा समाज घडविण्यासाठी आज सामाजिक भेदभाव मिटविणे गरजेचे आहे. त्यासाठी क्रांतिकारक पाऊल उचलणे आवश्यक असल्याचे वक्तव्य राजस्थान व मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू तथा संत तुकाराम सामाजिक विकास परिषदेचे अध्यक्ष डॉ. अरुण सावंत यांनी केले. जगतगुरू संत तुकाराम महाराज यांच्या जयंती सोहळ्य़ानिमित्त रविवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर खुले नाट्यगृहात आयोजित कार्यक्रमत ह्यशेतकर्‍यांचे समुपदेशन : कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पन्न घेण्यासाठी शेती कशी करावी?ह्ण या विषयावर ते बोलत होते. कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने करण्यात आली. यावेळी राष्ट्रीय कीर्तनकार डॉ. उद्धव गाडेकर महाराज, माजी आमदार नारायणराव गव्हाणकर, माजी महापौर सुमनताई गावंडे, सुरेश पाटीलखेडे, प्रा. डॉ. सुभाष भडांगे, विजय कौसल, प्रकाश बोर्डे, दीपक भरणे, सुभाष दातकर, सुरेखाताई मेतकर, सुमनताई भालदाणे, शोभाताई शेळके, रामेश्‍वर बरगट, प्रकाश तायडे, पंकज जायले, कृष्णराव देशमुख, वासुदेव बेंडे, राजेश डोंगरकर, नंदू बोपुलकर, श्रीकांत ढगेकर, डॉ. सुधीर ढोणे, प्रा. दिलीप सावरकर, प्रमोद देंडवे यांची प्रमुख उपस्थिती होती. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी अनिष्ट रुढी, परंपरेला तिलांजली देऊन समाजप्रबोधनाचे कार्य केले. त्यांच्या या कार्याची प्रेरणा घेऊन आज समाजातील भेद दूर करणे आवश्यक आहे; परंतु त्यांच्या विचारांनी समाज परिवर्तनाचे हे समीकरण अद्यापही जुळले नसल्याचे डॉ. सावंत यावेळी म्हणाले. या सामाजिक विषमतेमुळेच आज शेतकरी आत्महत्येचे प्रमाण वाढले आहे. याच सामाजिक विषमतेचे उदाहरण देताना ते म्हणाले की, राज्यातील अनेक उद्योग बंद पडण्याच्या मार्गावर असल्यावरही त्यांना कोट्यवधीचे कर्ज दिल्या जाते. यामध्ये नुकसान होऊनही उद्योजक आत्महत्या करत नाही. तर दुसरीकडे भूमिहीन शेतकर्‍यांना कर्जदेखील मिळत नाही. ही विषमता दूर करण्यासाठी शेतकर्‍यांनी शेतीपलीकडे जाऊन व्यवसायाचा विचार करणे गरजेचे असून, समाजबांधवांनी त्यांना मार्गदर्शन करून समाजातील विषमता दूर करण्याचे आवाहन डॉ. अरुण सावंत यांनी यावेळी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक माणिक शेळके यांनी, सूत्रसंचालन शिवाजी भोसले यांनी, तर आभार अँड. संतोष भोरे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विशाल तायडे, शिवदास महल्ले, राजेश्‍वर वाकोडे, अभिजित गहुकर, सागर दळवी, स्वप्निल अहीर, मंगेश लांडगे, राजू सावरकर, अनंत फाटे, पांडुरंग सोनटक्के, नरेंद्र चितोडे, किशोर कुचडे, आशीष शेळके आदींनी परिश्रम घेतले.