अकोला : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ क्रीडांगण येथे शनिवारी खेळल्या गेलेल्या १७ वर्षीय विभागीयस्तर नेहरू कप हॉकी स्पर्धेत मुलींच्या गटात यवतमाळ आणि मुलांच्या गटात अमरावती महानगरपालिका संघाने विजय मिळवून राज्यस्तर स्पर्धेकरिता प्रवेश निश्चित केला. दोन्ही संघ राज्यस्तर स्पर्धेत अमरावती विभागाचे प्रतिनिधित्व करणार आहेत.क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व हॉकीअकोला यांच्या संयुक्त विद्यमाने स्पर्धेचे आयोजन केले आहे. शनिवारी मुलांच्या गटात पहिला उपान्त्य सामन्यात बुलडाणा संघाने अकोला महानगरपालिका संघाला ३-० ने पराभूत केले. दुसऱ्या सामन्यात अमरावती मनपाने यवतमाळ संघाला ५-० ने हरवित अंतिम सामन्यात प्रवेश निश्चित केला. अंतिम सामना बुलडाणा आणि अमरावती मनपा संघात खेळला गेला. सामन्यात दोन्ही संघाने तुल्यबळ लढत दिली. शेवटी अमरावती मनपा संघाने १-० ने सामना जिंकू न राज्यस्तर स्पर्धेकरिता पात्रता सिद्ध केली.मुलींच्या गटातील पहिला उपान्त्य सामना अकोला मनपा व यवतमाळ जिल्हा संघात झाला. यवतमाळने अकोला मनपा संघाला २-० ने हरवून अंतिम फेरीसाठी स्थान निश्चित केले. दुसºया सामन्यात अमरावती मनपाने अकोला जिल्हा संघाला ३-० ने नमविले. अंतिम सामना अमरावती मनपा व यवतमाळ जिल्हा संघात झाला. यामध्ये यवतमाळ संघाने अमरावती मनपावर ३-० असा सहज विजय मिळवित, राज्यस्तर स्पर्धेत प्रवेश निश्चित केला. पोलीस मुख्यालयाचे आरपीआय विकास तिडके, हॉकी असोसिएशनचे उपाध्यक्ष डॉ. संदीप चव्हाण, सचिव धीरज चव्हाण, सुशील सुर्वे, उमेश बिडवे, खेळ विभागप्रमुख सलीम शेख, राजू उगवेकर, भूषण साळवे, अजय कांबळे, विशाल निंबाळकर, मयूर निंबाळकर, स्वप्निल अंभोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत विजेत्या संघाला बक्षीस वितरित करण्यात आले. स्पर्धेत पंच म्हणून शुभम निंबाळकर, अभिजित तिवळकर, चंदन ठाकूर, ऋषभ खत्री, मयूर चौधरी, यश पवार, शाहरू ख खान, दीपिका सोनार यांनी काम पाहिले. जिल्हा क्रीडा अधिकारी आसाराम जाधव यांच्या मार्गदर्शनात स्पर्धा यशस्वी पार पडली.फोटो:०९सीटीसीएल३८