खारपाणपट्टयातील शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाण्याची प्रतीक्षा
अकाेला : खारपाणपट्टयातील महत्वकांक्षी पुर्णा बॅरेज-२ (नेरधामणा) च्या बांधकामाची किंमत १९८ काेटींहून ८८८ काेटींवर पाेहाेचली आहे. बॅंरेजचे काम पुर्ण झाल्याचा दावा पाटबंधारे विभागाने केला आहे.पंरतु भूमिगत (पीडीएन) जलवाहिनीच्या कामाचा अद्याप मुहूर्त निघाला नसल्याने खारपाणपाण पटटयातील शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाण्याची प्रतीक्षा आहे. पश्चिम विदार्भातील अकाेला,अमरावती आणि बुलडाणा जिल्ह्यातील भूभा्ग खारपाणपट्ट्याने व्यापला आहे. खारपाणपट्टयातील पाणी समुद्राच्या पाण्यासारखे खारे आहे. म्हणूनच या भागात धरण बांधणे गरजेचे हाेते. पंरतु खारपाणपट्टयातील माती चाेपण असल्याने धरण बांधने अशक्य हाेते. या पृष्ठभूमीवर बॅरेजची संकल्पना पुढे आली आणि या पट्टयात आधुिनक तंत्रज्ञानाचा वापर करून बॅरेजची शृंखला तयार करण्यात येत आहे. त्यातीलच नेरधामणा एक बॅरेज आहे. डायफाॅम वाॅल उभारून हे बॅंरेज बांधण्यात आले आहे. गत जून महिन्यात यात जलसाठा संचयित करण्यात आला. असे असले तरी नवीन तंत्रज्ञान वापरून (पीडीएन) भूमिगत जलवाहिनीव्दारे शेतात पाणी पाेहाेचविण्याची संकल्पना पुढे आली. पंरतु या पीडीएन आणि पंपहाऊसच्या कामाचा अद्याप मुहर्तच निघाला नसल्याने गत १२ वर्षार्पासून शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाण्याची प्रतीक्षा आहे. नया दरम्यान,नेरधामणाच्या पीडीएन आणि पंपहाऊस संकल्प चित्रात बदल करण्यात आल्याने किंमतीत वाढ झाली आहे. यासाठीची मान्यता हवी असल्याने शासनाकडे प्रस्ताव सादर केला असल्याची माहिती पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभिंयता चिन्मय वाकाेडे यांनी दिली.
- उमा, काटेपूर्णाचे काम रखडले
मूर्तीजापूर तालुक्यातील उमा आणि काटेपूार्णा बॅरेजचे काम रखडले आहे. उमा बॅरजचे बांधकाम तर गत दहा वर्षापासून बंद आहे. या बॅरेजचे काम पूर्ण हाेवून सिंचनाला पाणी मिळावे अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.
- शहापूर बृहत पाइप लाइनसाठी रखडले
अकाेट तालुक्यातील शहापूर बृहत चे काम २०१७ मध्येच पूर्ण झाल्याचा दावा पाटबंधारे विभागाने केला आहे. याही प्रकल्पाची किंमत ६४ काेटींहून २५९ काेटींवर पाेहाेचली आहे. पण सिंचनाला पाणी देण्यासाठी पाइप लाइनचे काम झाले नाही.
- कवठा पुलाचे काम रखडले
कवठा बॅरेजची मूळ किंमत ६७ काेटी हाेती आजिमतीस ही किंमत ३०६ काेटींवर गेली आहे. बॅंरेजचे बांधकाम पूर्ण झाले आहे. केवळ लाेहारा येथील पुलाचे काम झाले नसल्याने शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी मिळणे कठीण झाले आहे.- शहापूर बृहत पाइप लाइनसाठी रखडले
अकाेट तालुक्यातील शहापूर बृहत चे काम २०१७ मध्येच पूर्ण झाल्याचा दावा पाटबंधारे विभागाने केला आहे. याही प्रकल्पाची किंमत ६४ काेटींहून २५९ काेटींवर पाेहाेचली आहे. पण सिंचनाला पाणी देण्यासाठी पाइप लाइनचे काम झाले नाही.
- पुलाचे काम रखडले
कवठा बॅरेजची मूळ किंमत ६७ काेटी हाेती आजिमतीस ही किंमत ३०६ काेटींवर गेली आहे. बॅंरेजचे बांधकाम पूर्ण झाले आहे. केवळ लाेहारा येथील पुलाचे काम झाले नसल्याने शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी मिळणे कठीण झाले आहे.