कर्जमाफीपासून शेतकरी वंचित
पारस : राज्य शासनाने शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली आहे. मात्र, माेताळा तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळालेला नाही. याकडे वरिष्ठांनी लक्ष देण्याची मागणी हाेत आहे.
रस्त्यावरील धुळीमुळे वाहनधारक त्रस्त
अकोट : तालुक्यातील अनेक गावांमध्ये रस्त्यावर घुळीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. त्यामुळे वाहनधारकांना वाहने चालविताना कसरत करावी लागत आहे. दुचाकीचालकांना समाेरचे वाहन दिसत नसल्याने अपघातांत वाढ झाली आहे.
कापूस वेचणीसाठी मजूर मिळेना
बोरगावमंजू : परिसरातील खरप, घुसर या भागात सध्या कापूस वेचणीस सुरुवात झाली आहे. परिसरात अनेक शेतकऱ्यांनी कापसाची पेरणी केलेली आहे. मात्र, एकाच वेळी सर्वच शेतकऱ्यांनी वेचणी सुरू केली आहे. मजुरी जास्त देऊनही कापूस वेचणीसाठी मजूर मिळत नसल्याचे चित्र आहे.
रेतीअभावी घरकुलांचे काम रखडले
तेल्हारा : शासनाने घरकुल लाभार्थींना रेती देण्याची घाेषणा केली हाेती. मात्र, गत काही दिवसांपासून घरकुल लाभार्थींचे अनुदान रखडले आहे. तसेच रेतीही मिळत नसल्याने अनेक लाभार्थींची घरे अर्धवट आहे. याकडे वरिष्ठांनी लक्ष देण्याची गरज आहे.